मुंबईत १ ते ५ डिसेंबर १० टक्के पाणी कपात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 November 2024

मुंबईत १ ते ५ डिसेंबर १० टक्के पाणी कपात


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये आज दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी तांत्रिक बिघाड झाला आहे. सदर दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. दिनांक ०१ डिसेंबर २०२४ ते दिनांक ०२ डिसेंबर २०२४ रोजी दुरुस्ती काम सुरू राहणार आहे. या तातडीच्या दुरुस्ती कामामुळे मुंबई शहर व उपनगरांसह बृहन्मुंबई महानगरपालिके मार्फत ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. यामुळे दिनांक ०१ डिसेंबर २०२४ ते दिनांक ०५ डिसेंबर २०२४ या कालावधीत पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्यात येणार आहे.

नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून या कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे व बृहन्मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, अशी विनंती महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Water cut in Mumbai)(Mumbai latest News) 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad