जगभरातील ९० टक्के मृत्यू ‘वणवा’ प्रदुषणामुळे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जगभरातील ९० टक्के मृत्यू ‘वणवा’ प्रदुषणामुळे

Share This

न्यूयॉर्क - द लॅसेंट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार जगभरात जंगलांना लागणा-या वणव्याने ९० टक्के मृत्यू अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशात होत असल्याचे उघडकीस आले आहे. या देशात भारताचा देखील समावेश आहे. अन्य देशात चीन, इंडोनेशिया आणि सहारा, आफ्रीका येथील देशांचा समावेश आहे. जेथे लॅण्ड स्केप फायर ( वणवा ) यांच्या कारणाने होणा-या आजारांचा सर्वाधिक भार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या मोनाश युनिव्हर्सिटीच्या संशोधनासह एका आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या ग्रुपला असे आढळले की लॅण्ड स्केप फायरने सार्वजनिक आरोग्यावर होणा-या परिणामात भौगोलिक आणि सामाजिक, आर्थिक असमानता आहे. लॅण्डस्केप फायर म्हणजे जंगलांना लागणारे वणवे हे मानव निर्मित आणि नैसर्गिक असा दोन्ही प्रकारचे आहेत. जास्तीत जास्त मृत्यू अशा प्रकारच्या आगीने होणा-या हवेच्या प्रदुषणाने होत असतात.

ज्यामुळे मोठ्या कालावधीपर्यंत हृदय आणि श्वसनासंबंधीचे आजार वाढत असतात. या अभ्यासात प्रदुषणाने हृदयासंबंधीत आजाराने वार्षिक सुमारे ४.५ लाख मृत्यू होतात आणि श्वसनाच्या संबंधीत आजाराने वर्षाला सुमारे २.२ लाख मृत्यू होत असतात. त्यामुळे जंगलाला लागणा-या वणव्याने होणा-या प्रदुषणाची तीव्रता समजून येते. साल २०००-२०१९ दरम्यान २०४ देश आणि क्षेत्रातील वार्षिक मृ्त्यूदर, लोकसंख्या आणि सामाजिक डेमोग्राफीक डाटाचे संशोधकानी विश्लेषण केले. जे २०१९ ग्लोबल बर्डन ऑफ डिसिज स्डटीजमधून घेतला होता. हा युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनच्या इन्स्टीट्युट ऑफ हेल्थ मॅट्रीक्सने कॉर्डीनेट केला आहे. हा डाटा काळानुसार जगभरातील आरोग्य हानीचे सर्वांत मोठे आणि सर्वसमावेशक कारण जंगलातील वणवे आहेत.

आरोग्यावर दुष्परिणाम - 
जागतिक हवामान बदल आणि जंगलांना लागणा-या वणव्यांमुळे होणा-या वायूप्रदूषणामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी तत्काळ पावले उचलायला हवीत. कमजोर राष्ट्रांच्या मदतीसाठी उच्च उत्पन्न असणा-या देशांनी आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य करुन मृत्यूदरातील सामाजिक, आर्थिक असमानता दूर करण्यासाठी मदत करायला हवी आहे. या प्रयत्नांना क्लायमेट चेंजेस आणि अनुकूल धोरणांना जोडायला हवे, त्यामुळे जंगलातील वणव्यांच्या प्रदुषणामुळे होणा-या आरोग्याच्या हानीवर उपाय मिळेल असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. संशोधनात ग्लोबल फायर एमिशन डेटाबेसचा देखील वापर केला होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages