मालाड येथील प्राण्यांची दहनवाहिनी २ डिसेंबरपासून तीन आठवडे बंद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मालाड येथील प्राण्यांची दहनवाहिनी २ डिसेंबरपासून तीन आठवडे बंद

Share This


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मालाड येथील स्मशानभूमीमध्ये लहान आकाराच्या मृत प्राण्यांच्या दहनासाठी करण्यात आलेली सुविधा ही देखभालीची कामे करण्याच्या उद्देशाने दिनांक २ डिसेंबर २०२४ पासून पुढील तीन आठवडे तात्पुरती बंद राहणार आहे. देखभालीची कामे पूर्ण झाल्यानंतर ही सुविधा पुन्हा सुरू करण्यात येईल, असे प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

सुमारे ५० किलो वजनापेक्षा कमी वजनाच्या मृत प्राण्यांचे दहन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशूवैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने मालाड येथील स्मशानभूमीमध्ये सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मृत प्राण्यांचे दहन करण्यासाठी नोंदणी करण्याच्या उद्देशाने https://vhd.mcgm.gov.in/incineration-booking ही लिंकही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या लिंकवर नोंदणी करुन, निवडलेल्या विहित वेळेत मालाड येथील स्मशानभूमीमध्ये मृत प्राण्याचे अंत्यविधी करता येतात. तथापि, सदर दहनवाहिनीच्या देखभाल कामासाठी दिनांक २ डिसेंबर २०२४ पासून पुढील तीन आठवड्यांच्या कालावधीदरम्यान ही सुविधा बंद ठेवण्यात येणार आहे. देखभालीची कामे पूर्ण झाल्यानंतर ही सुविधा पूर्ववतपणे सुरू करण्यात येईल, असे पशूवैद्यकीय आरोग्य विभागाचे महाव्यवस्थापक कलीमपाशा पठाण यांनी प्रशासनाच्या वतीने कळवले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages