मुंबई - महाराष्ट्रातील २८८ पैकी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदारांसाठी मागासवर्गीयांच्या प्रश्नांवर पाठपुरावा करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे तसेच त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी समिती नियुक्त करावी अशी मागणी भीम आर्मी या सामाजिक संघटनेने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना पत्र पाठवून केली आहे. (MLAs from backward class constituencies)(Political News)(Latest News)(Breaking News)
महाराष्ट्रात एकूण २८८ विधानसभा मतदारसंघासाठी सार्वत्रिक निवडणूक पार पडली आहे. यात २९ जागांवर अनुसूचित जाती तसेच २५ जागांवर अनुसूचित जमाती मतदारसंघातून २५ असे ५४ आमदार निवडून आले आहेत. या आमदारांनी सदरहू मतदारसंघातील मागासवर्गीय समूहाच्या सर्वांगीण विकासाच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उचलून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे अपेक्षित आहे. अपवाद वगळता यातील बहुतांशी आमदार हे सदर प्रवर्गातील समाजासाठी विधानसभेत आवाज उचलताना दिसत नाहीत किंवा त्यांच्या कामकाजाची माहिती जनतेत पोहोचत नाही. पर्यायाने सदर मतदारसंघात त्यांच्याविषयी नाराजीची भावना पसरते. त्यामुळे या ५४ आमदारांसाठी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मार्गदर्शक तत्वे घालून द्यावीत. सोबतच त्यांच्या कामकाजासंदर्भात समिती नियुक्त करावी, अशी मागणी भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी राज्यपालांना पत्र पाठवून केली आहे.
No comments:
Post a Comment