दररोज 'या' तेलाने करा चेहऱ्याची मालिश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 November 2024

दररोज 'या' तेलाने करा चेहऱ्याची मालिश


वातावरणातील बदलांमुळे या ऋतूत आपली त्वचा लवकर खराब होत असते. त्वचेवर कितीही स्किन केअर प्रोडक्टस वापरले तरी दुसऱ्या दिवशी आपला चेहरा पुन्हा पूर्वीप्रमाणे होतो. त्वचेकडे जराही दुर्लक्ष केले तर ती निर्जीव आणि कोरडी पडू लागते. हिवाळ्याचा गारवा आता जाणवू लागला आहे. हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यायला हवी. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्याची समस्या ही सर्वांनाच उद्भवत असते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी लोक नवनवीन प्रोडक्टसचा वापर करत असतात.

त्वचेसाठीच्या अनेक क्रीम्स आणि लोशन्स बाजारात उपलब्ध आहेत मात्र हे प्रोडक्टस नेहमीच आपल्या त्वचेवर उत्तम काम करतात असे नाही. बऱ्याच स्किन केअर प्रोफेक्टसमध्ये काही रसायनांचा वापर केला जातो, जो आपल्या त्वचेसाठी घातक ठरू शकतो. अशा परिस्थितीत, त्वचेची काळजी घेण्यासाठी कोणते प्रोडक्टस वापरावे जे त्वचा दीर्घकाळ मऊ ठेवू शकेल, हा प्रश्न वारंवार सतावतो. याचे उत्तर आज आम्ही तुम्हाला या लेखात देत आहोत. यासाठी तुम्ही एका नैसर्गिक तेलाचा वापर करू शकता. ते येतील कोणत्याही लोशन किंवा क्रीमपेक्षा त्वचेसाठी अधिक फायदेशीर ठरते.

त्वचेला करा मॉइश्चराइज -
नारळ तेल एक असे तेल आहे ज्यामध्ये ओलावा लॉक करण्याची शक्ती असते. आपल्या हाय फॅट कंटेंट, व्हिटॅमिन ई आणि मध्यम चेन फॅटी ऍसिडमुळे, हे तेल त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. ज्यामुळे त्वचेवर संरक्षणात्मक थर देखील तयार होतो. ज्यांची त्वचा जास्त कोरडी आहे, त्यांनी कोल्ड प्रेस केलेले खोबरेल तेल वापरल्यास त्यांना याचा फार फायदा होईल. फार पूर्वीपासून केसांसाठी आणि त्वचेसाठी नारळ तेल वापरले जात आहे. आयुर्वेदातही या तेलाला फार महत्त्व आहे.

जळजळ कमी करते - 
नारळाचे तेल हे दाहक-विरोधी तेल आहे. या तेलामध्ये लॉरिक ॲसिड देखील असते ज्यामुळे चेहऱ्यावरील जळजळ, लालसरपणा, सूज आणि खाज कमी होते. नारळाचे तेल सौम्य देखील असते, म्हणून जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर हे तेल तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.

मुरुम (Acne) कमी करते - 
नारळाचे तेल नॉन-कॉमेडोजेनिक देखील असते. कॉमेडोन म्हणजे चेहऱ्यावरील लहान हट्टी मुरुम, हे मुरुमांसारखेच असतात. अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असलेले तेल चेहऱ्यावरील घाण देखील काढून टाकते. नारळाच्या तेलात असलेले लॉरिक ॲसिड आणि कॅप्रिक ॲसिड देखील चेहऱ्यावर बॅक्टेरियांना जास्त काळ टिकू देत नाही. यामुळे त्वचेवरील पोर्स मोकळे होतात आणि त्वचा साफ होते.

त्वचा रिपेअर करण्यास करते मदत - 
त्वचेवर थोडासा ओरखडा पडला असेल किंवा त्वचा जळली असेल तर नारळाचे तेल हे लवकर बरे करण्यास मदत करते. नारळाचे तेल जखमी झालेल्या टिश्यूजची जलद दुरुस्ती करण्यास मदत करते.

सनबर्नपासून आराम मिळवून देते - 
जर तुमची त्वचा सूर्याच्या अतिनील किरणांच्या संपर्कात आली असेल किंवा उन्हात जळत असेल तर तुम्हाला नारळ तेलाने आराम मिळू शकतो. त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्याबरोबरच, खोबरेल तेल त्वचेला सूर्यप्रकाशाच्या नुकसानीपासून मुक्त होण्यास देखील मदत करते.

स्किन टोनला करते बॅलेन्स - 
नारळ टेलर नॅचरल व्हिटॅमिन ई असते, ज्यामुळे हिवाळ्यात हरवलेल्या त्वचेची चमक परत मिळण्यास याची मदत होते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे तेल स्किन व्हाइटिंग क्रीममध्ये मिसळूनही याचा वापर चेहऱ्यावर करू शकता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad