थंडीमुळे त्वचेवर सुरकुत्या, ‘या’ पद्धतीने करा तुपाचा वापर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

थंडीमुळे त्वचेवर सुरकुत्या, ‘या’ पद्धतीने करा तुपाचा वापर

Share This

 

थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडणे, रुक्ष आणि निस्तेज होऊन जाते. शिवाय या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर केस गळू लागतात. त्वचा कोरडी पडल्यानंतर कितीही मेकअप केला किंवा इतर कोणतेही महागतले प्रॉडक्ट वापरले तरीसुद्धा त्वचा खराब दिसू लागते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेची योग्य ती काळजी घ्यावी. थंडी चालू झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात बदल, स्किन केअर, पौष्टिक पदार्थांचे सेवन इत्यादी गोष्टी फॉलो कराव्यात.

थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी मॉईश्चरायजर लावणे आवश्यक आहे. त्वचेला सूट होईल असे मॉईश्चरायजर लावावे, ज्यामुळे त्वचा तुकतुकीत राहील. हिवाळ्यात तुम्ही मॉईश्चरायजर म्हणून तुपाचा वापर करू शकता. तुपामध्ये असलेले गुणधर्म त्वचा सुंदर आणि चमकदार ठेवण्यासाठी मदत करतात. त्वचेला तूप लावल्यामुळे चेहऱ्यात हळूहळू बदल जाणवू लागतो. पण जास्त तेलकट त्वचा असलेल्या महिलांनी चेहऱ्यावर तूप लावू नये. तूप लावल्यामुळे त्वचा आणखीन तेलकट होण्याची शक्यता असते. तूप लावून त्वचेवर मसाज केल्यास रक्तभिसरण सुधारते आणि त्वचेचा रंग हळूहळू बदलू लागतो.

तूप आणि मध:
हिवाळ्यात सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी तुपामध्ये तुम्ही मध मिक्स करून लावू शकता. यामुळे हायड्रेट राहील. शिवाय त्वचेमधील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आहारात तुपाचे सेवन करावे, वाटीमध्ये अर्धा चमचा तूप घेऊन त्यात थोडेसे मध मिक्स करून संपूर्ण त्वचेवर लावा. 10 ते 15 मिनिटं ठेवल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवा आणि त्यानंतर फेसवॉश वापरून पुन्हा एकदा त्वचा स्वच्छ करा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील.

तूप आणि बेसन:
त्वचा रंग उजळ्वण्यासाठी बेसन अतिशय प्रभावी आहे. वाटीमध्ये तूप घेऊन त्यात बेसन घेऊन मिक्स करून घ्या. तयार पेस्ट त्वचेवर लावून काहीवेळ सुकण्यासाठी ठेवा. यामुळे त्वचेचा रंग उजळून टॅनिंगची समस्या कमी होईल. चेहरा व्यवस्थित सुकल्यानंतर कोमट पाण्याने त्वचा धुवून घ्या. हा उपाय केल्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतील आणि त्वचा चमकदार दिसू लागेल. 

तूप आणि मुलतानी:
टॅनिंगच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी वाटीमध्ये तूप घेऊन त्यात मुलतानी माती मिक्स करा. मुलतानी माती त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करते. पिंपल्स कमी करण्यासाठी तुम्ही मुलतानी मातीचा वापर करू शकता. तयार केलेले मिश्रण संपूर्ण त्वचेवर लावून काहीवेळ तसेच ठेवून नंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी होतील.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages