विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी BMC च्या कर्मचाऱ्यांना 29,000 रुपयांचा दिवाळी बोनस मिळाला होता. मात्र नागरी संस्थेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या BEST च्या 27,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना अद्याप कोणताही बोनस मिळालेला नव्हता तो आज मिळाला आहे.
चालकांच्या आंदोलनादरम्यान बस टंचाईची परिस्थिती टाळण्यासाठी बेस्टने ही रक्कम आधीच वितरित केली असती तर प्रवाशांचे हाल झाले नसते. गेल्या काही आठवड्यांपासून प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. पूर्वी कंत्राटदारांनी बसेसच्या वितरणास उशीर केला होता त्यामुळेही प्रवाशांचे हाल झाले होते, असं बेस्ट वर्कर्स युनियनचे नेते शशांक राव यांनी म्हटलं आहे.
No comments:
Post a Comment