मुंबई- नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पश्चिम रेल्वेकडून विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. या विशेष लोकल फेऱ्या ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीच्या पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत.
पश्चिम रेल्वे मार्गावर मंगळवार ३१ डिसेंबर रोजी रात्री सव्वा एक वाजता चर्चगेट येथून एक विशेष लोकल रवाना होणार असून ती २.५५ वाजता विरारला पोहोचणार आहे.दुसरी लोकल चर्चगेट येथून मध्यरात्री २ वाजता रवाना होऊन ३.४० वाजता विरारला पोहोचणार आहे. तिसरी विशेष लोकल चर्चगेट येथून पहाटे २.३० वाजता रवाना होऊन ४.१० वाजता विरारला पोहोचणार आहे.तसेच चौथी विशेष लोकल चर्चगेट येथून पहाटे ३.२५ वाजता रवाना होणार आणि ५.०५ वाजता विरारला पोहचणार. त्याचप्रमाणे विरारहून सुटणाऱ्या विशेष लोकल मध्ये मध्यरात्री १२.१५ वाजता विरारहून सुटणार आणि १.५२ वाजता चर्चगेटला पोहोचणार.तसेच मध्यरात्री १२.४५ वाजता विरार येथून लोकल सुटणार आणि २.२२ वाजता चर्चगेट येथे पोहोचणार.मध्यरात्री १.४० वाजता विरार येथून सुटलेली लोकल ३.१७ वाजता चर्चगेटला पोहोचणार आहे.या सर्व विशेष लोकल ट्रेन सर्व रेल्वे स्थानकांवर थांबणार आहेत.
No comments:
Post a Comment