ऑनलाईन मैत्री पडली महागात, राज्यात 463 जणांना HIV ची बाधा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 December 2024

ऑनलाईन मैत्री पडली महागात, राज्यात 463 जणांना HIV ची बाधा


मुंबई - ऑनलाईन द्वारे सर्व व्यवहार केले जात असताना ऑनलाईन मैत्री करणे सध्या फॅशन झाले आहे. मात्र हीच ऑनलाईन मैत्री करण्याच्या नादात महाराष्ट्रात 463 जणांना HIV ची म्हणजेच एड्सची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात एकट्या मुंबईतील 163 जणांचा समावेश आहे. तर इतर पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, आणि सोलापूर जिल्ह्यातील हे तरूण आहेत. 

ऑनलाईन डेटिंग अॅपचे विश्व अतिशय खोल आहे. डेटिंग अॅप डाऊनलोड केल्यानंतर आधी मैत्री , नंतर दिवस रात्री चॅटिंग, फेस टाईम यामध्ये मैत्री संपून कधी एखादे नाते सुरू होते हे तरूण-तरूणींना कळतच नाही. नाते सुरू झाल्यानंतर अर्थातच शारीरिक गरजा पूर्ण करेपर्यंत मैत्री जाते. हीच ऑनलाईन मैत्री राज्यातील 463 जणांना नडली आहे. यामध्ये एकट्या मुंबईतील 119 जण आहेत. तर राज्यातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, आणि सोलापूर जिल्ह्यातील आहेत.

जिल्हा एड्स नियंत्रण अॅप किंवा सर्च बॉक्समध्ये एड्सबाबतच्या चॅट आणि माहिती सर्च करणाऱ्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. ऑनलाईन ओळखीनंतर या व्यक्ती जेव्हा प्रत्यक्षात शारिरीक संबध करण्यासाठी एकमेकांना पहिल्यांदा भेटल्या तेव्हाच त्यांना एचआयव्हीचे संक्रमण झाल्याचे समजले आहे. यातील बहुतेकांना तर याची लागण झाल्याचेही माहीत नव्हते.

असुरक्षीत लैगिंक संबंधामुळे एचआयव्ही संसर्गाचा धोका देखील वाढला आहे. यात तरूण वर्ग जास्त अडकला आहे. यासाठी जनजागृती करणे अतिशय महत्त्वाचे आहे.या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या मते ऑनलाईन डेटिंग साइट्सनी याविषयी जागरुकता पसरवणे गरजेचे आहे. यातून उद्भवू शकणाऱ्या धोक्यांविषयी लोकांना माहिती देणे गरजेचे आहे. तसेच ऑनलाईन पार्टनरसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी दोघांनीही एचआयव्हीची तपासणी करुन घेणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad