बसचालक मोरेला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बसचालक मोरेला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Share This


मुंबई - कुर्ला बस अपघात प्रकरणी कोर्टाने आरोपी संजय मोरे याला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी 7 दिवसांची कोठडी मागितली होती, तर आरोपीच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली.

कुर्ला बस अपघात प्रकरणातील आरोपी संजय मोरेला व्हिसीद्वारे हजर करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव आरोपीला कोर्टात न आणता व्हिसीद्वारे कोर्टात हजर करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कोर्टाकडे तसा लेखी अर्ज दिला होता. कोर्टाने संबंधित अर्ज मान्य केल्यास आरोपीला व्हिसीद्वारे हजर करण्यात येणार होते. पण कोर्टाने तो अर्ज फेटाळला. न्यायाधीशांनी आरोपीला प्रत्यक्षात कोर्टात हजर करण्याच्या सूचना दिल्या. आरोपीला कोर्टात आणून हजर करण्याच्या सूचनेनंतर पोलिसांनी आरोपी संजय मोरे याला कोर्टात आणलं. यानंतर या प्रकरणाच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली.

आरोपी संजय मोरे याने बेस्ट बस चालवताना 300 मीटर परिसरात 50 ते 60 गाड्यांना धडक दिली. ड्रायव्हरला पूर्ण कल्पना होती की हा रहदारीचा परिसर आहे. गाडीतही पॅसेजर होते. ड्रायव्हरने ही गाडी बेदरकारने चालवली. त्यामागे हेतू काय होता? हा कट आहे का? यामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का? याचा तपास करायचा आहे. तो अमली पदार्थच्या सेवनाखाली होता का? याचीही चौकशी करायची आहे. त्यामुळे आरोपीची 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद पोलिसांनी कोर्टात केला.

आरोपीच्या वकिलांनी, आरोपीची कोठडी कशासाठी हवी आहे? असा सवाल केला. “बेस्ट प्रशासनाला योग्य तो पत्रव्यवहार करून त्यांना हवी असलेली माहिती घेऊ शकतात. आरोपीचे प्रशिक्षण झाले आहे की नाही हे बेस्ट प्रशासन सांगू शकतं. आरोपीची अटक झाल्यावर मेडिकल करण्यात आलं होतं. जर त्याने नशा केली असेल तर ते समोर आले नसेल का?”, असा सवाल आरोपीच्या वकिलांनी केला. आरोपीच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध केला.

यावेळी पोलिसांनी कोर्टात एक महत्त्वाचा प्रश्न मांडला. या बसचा आरोपीने हत्यार म्हणून वापर केला आहे का? हा एक कट आहे का? याचा तपास करायचा आहे, असे पोलीस कोर्टात म्हणाले. तर दुसरीकडे आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, “पोलीस कोठडीसाठी पोलिसांकडे कोणतेही व्हॅलिड कारण नाही.” दोन्ही बाजू्ंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपीला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

कुर्ला येथे सोमवारी रात्री बेस्ट बसचा मोठा अपघात झाला. भरधाव बेस्ट बसने दिलेल्या धडकेत ७ जणांचा मृत्यू झाला असून ४९ पेक्षा जास्त जखमी झाल्याची माहिती आहे. बेस्ट अपघाताची सविस्तर चौकशी करण्यासाठी वाहतूक विभागाचे मुख्यव्यवस्थापक यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.तसेच या अपघातामधील मृतांच्या नातेवाईकांना तातडीची मदत म्हणून रुपये २ लाख रुपये बेस्ट उपक्रमामार्फत जाहीर करण्यात आले आहेत. तसेच जखमींवर औषधोपचारांचा खर्च मुंबई महानगरपालिका व बेस्ट उपक्रम यांच्यामार्फत केला जाणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे. याच दरम्यान, न्यायालयाने या अपघातातील बसचालक संजय मोरेला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages