राज्यात ‘जीबीएस’चा चौथा तर पुण्यात तिसरा बळी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्यात ‘जीबीएस’चा चौथा तर पुण्यात तिसरा बळी

Share This

मुंबई / पुणे - महाराष्ट्रात विशेष करून पुण्यात गीया बार्रे सिंड्रोम (GBS) (Gaia Barre syndrome) या आजाराने वेगाने पाय पसरायला सुरुवात केली आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पुण्यात गीया बार्रे सिंड्रोमच्या संशयित रुग्णांची संख्या १३० रुग्णांची नोंद झाली असून या पैकी ७३ रुग्णांचे गीया बार्रे सिंड्रोमचे निदान झाले असून आज पुण्यातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पुण्यातील तिसरा तर राज्यातील चौथा बळी ठरला आहे. (Fourth GBS victim in the state)

महत्त्वाचे म्हणजे यातील २० रुग्ण हे व्हेंटिलेटर वर असून उपचार घेत आहेत. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. १५०० हून अधिक घराचं निरीक्षण करण्यात आल असून ८ दिवसात रुग्णांची शंभरी पार केली आहे. राज्यात गीया बार्रे सिंड्रोमचे रुग्ण वाढत असल्याने आता केंद्र सरकारही अलर्ट मोडवर अली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये गुईलेन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण आढळून येत आहेत. या आजारामुळे आता एका ३६ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. जीबीएसची लागण झाल्यानंतर या तरुणाला न्यूमोनियाचीही लागण झाली होती. ३० जानेवारी रोजी महापालिकेच्या संत तुकाराम नगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. जीबीएसची लागण झाल्यानंतर या तरुणाला न्यूमोनियाची लागण झाली होती.

सर्वाधिक रुग्ण तरूण
पुण्यातील गिया बार्रे सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे तरुण वयोगटातील आहेत ३० रुग्ण हे २० ते २९ वयोगटातील आहेत. तर, शून्य ते नऊ वयोगटातील २२ मुलांना गिया बार्रे सिंड्रोम बाधित रुग्ण आहेत. आतापर्यंत, १२१ स्टूलचे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे पाठवण्यात आले आहेत आणि त्या सर्वांची एंटेरिक व्हायरस पॅनलसाठी चाचणी करण्यात आली आहे.

अकोल्यातही झाला शिरकाव
अकोल्यातही या आजराचा शिरकाव झाला असून गिया बार्रे सिंड्रोमचे ४ रुग्ण आढळले आहे. यामुळे अकोल्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

काय आहेत लक्षणे?
गिया बार्रे सिंड्रोम ही एक दुर्मिळ स्थिती आहे ज्यामुळे अचानक बधीरपणा आणि स्रायू कमकुवत होतात. हा एक दुर्मिळ स्वयंप्रतिकार रोग आहे. डॉक्टरांच्या मते, जीवाणू आणि विषाणूजन्य संसर्गामुळे सामान्यत: गिया बार्रे सिंड्रोम होतो. याचे कारण ते रुग्णांची प्रतिकारशक्ती कमकुवत करतात आणि सध्याच्या परिस्थितीत, हा रोग दूषित पाण्यामुळे सुरू झाल्याचा संशय आहे. या आजाराचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही. या स्थितीमुळे ग्रस्त असलेल्या बहुतेक लोकांना रुग्णालयात उपचारांची आवश्यकता असते.

सूचनांचे पालन करणे बंधनकारक
या आजाराची गांभीर्याने दखल राज्याच्या आरोग्य विभागाने घेतली असून आता जीबीएस आजारासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या सूचनांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जीबीएसच्या रुग्णांची वाढती संख्या, उपचार आणि औषधांची उपलब्धता याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. सर्व जिल्ह्यांना या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages