महाकुंभमेळ्यात अमृत स्नानादरम्यान चेंगराचेंगरी, 10 हून अधिक भाविकांचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महाकुंभमेळ्यात अमृत स्नानादरम्यान चेंगराचेंगरी, 10 हून अधिक भाविकांचा मृत्यू

Share This

उत्तर प्रदेश - प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात (दि.29) रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अमृत स्नानादरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 10 हून अधिक भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटना घडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन केल्याची माहिती आहे. तर चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या भाविकांना पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. तसेच यासाठी ग्रीन कॉरिडॉर देखील तयार करण्यात आला आहे.

दरम्यान, महाकुंभातील चेंगराचेंगरीबाबत, संगम नाक्यावर स्नान केल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवल्याचे सांगितले जात आहे. तर महाकुंभमेळा परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर, पोलीस आणि सुरक्षा दलांनी तात्काळ कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (बुधवार) महाकुंभमेळ्यातील मौनी अमावस्येचे अमृत स्नान आहे. यानिमित्त मोठ्या संख्येने संगमावर लोक आले आहेत. यावेळी गर्दी मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. संगम किनाऱ्यावर रात्री २ वाजताच्या सुमारास अधिक चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना याठिकाणी उपस्थित असलेल्या रुग्णवाहिकांद्वारे महाकुंभ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर महाकुंभमेळा प्रशासनाने आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्रपुरी यांना आखाड्यांचे अमृतस्नान  थांबवण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर हे अमृतस्नान सध्या थांबवण्यात आले आहे. तसेच, सर्व आखाडे आपल्या छावण्यांमध्ये परतत आहेत. त्याच वेळी, आखाड्यांच्या विशेष मार्गांनी सामान्य लोकांना बाहेर काढले जात आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी भाविकांना अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे. तसेच गंगा नदीच्या ज्या घाटाजवळ असाल तिथं स्नान करा, संगम घाटाकडे जाण्याचा प्रयत्न करु नका, असं देखील आवाहन त्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages