
मुंबई - घाटकोपर (Ghatkopar) रेल्वे स्थानकाला लागून रेड लाईट (Red Light Area) एरिया आहे. या रेड लाईट एरियामधून घाटकोपर रेल्वे स्थानकाला घाटकोपर अंधेरी लिंक रोडशी (Ghatkopar Andheri Link Road) नवा रस्ता उभारला जाणार आहे. या कामाच्या आड येणाऱ्या रेड लाईट एरियावर पालिकेने (BMC) हातोडा मारला आहे. पालिकेच्या तोडक कारवाईमुळे रस्ता उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
घाटकोपरची वसाहत वेश्या व्यवसायसाठी प्रसिद्ध होती. या परिसराच्या आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांनी या अगोदर देखील अनेकदा ही वसाहत इथून हटविण्याची मागणी केली होती. तर या ठिकाणावरून रेल्वे रुळाला समांतर असा घाटकोपर पश्चिमेकडून घाटकोपर अंधेरी लिंक रोडला जोडणारा रस्ता प्रस्तावित होता. मात्र इथे तीनशे पेक्षा जास्त रहिवासी घरे आणि दुकाने देखील आहेत. त्यांचे पात्र अपात्र प्रक्रिया पूर्ण करून पालिकेने पुनर्वसनाला सुरुवात केली आहे.
सोमवार आणि मंगळवार दोन दिवसात तब्बल 43 बांधकामे पाडण्यात आली आहे. रिकामे करण्यात आलेले बांधकाम तोडण्यास सुरुवात झाली आहे. तसेच रस्ते निर्माण करण्याच्या कामाला सुरुवात ही करण्यात आली आहे. पालिकेच्या या तोडक कारवाईमुळे इथे सुरू असलेली सर्व प्रकारची अनधिकृत कामे तर बंद होतीलच पण घाटकोपर रेल्वे स्थानकापासून पूर्व द्रुतगती मार्गावर तातडीने पोहचण्यास सोपा मार्ग निर्माण होणार आहे. घाटकोपरवासियांनी पालिकेच्या या कारवाईचे कौतुक केले आहे.
No comments:
Post a Comment