‘MahaMetro’च्या व्यवस्थापनाने कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

‘MahaMetro’च्या व्यवस्थापनाने कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा

Share This


मुंबई - ‘महामेट्रो’च्या व्यवस्थापनाने नागपूर येथील महामेट्रोच्या कंत्राटी कामगारांना केंद्र सरकारने निर्धारित केल्याप्रमाणे किमान वेतन देऊन न्याय द्यावा, असे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले.

महामेट्रोअंतर्गत नागपूर मेट्रो रेल, नागपूर येथे कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत कामगार मंत्री फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस आमदार प्रविण दटके, कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन, महामेट्रोचे महाप्रबंधक सुधाकर उराडे, कामगार विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कामगार संघटना तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर उपस्थित होते.

महामेट्रोमधील कंत्राटी कामगारांची केंद्रीय कामगार प्राधिकरणाकडे तसेच राज्य शासनाच्या कामगार विभागाकडे नोंदणी झाली आहे. तथापि, महामेट्रोच्या कंत्राटी कामगारांचा वेतनप्रश्न न्यायप्रविष्ट महामेट्रोमधील सर्व कंत्राटी कामगारांना शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे किमान वेतनानुसार वेतन देण्यासंदर्भात मेट्रो व्यवस्थापनाने कार्यवाही करण्याचे निर्देश कामगार मंत्री फुंडकर यांनी दिले.

राज्यातील मेट्रो रेल सेवेतील कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनासंदर्भात फुंडकर म्हणाले की, राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्याचबरोबर एमएमआरडीए, एमआरसीएल, पीएमआरडीए या मेट्रोमध्ये काम करणाऱ्या सर्व कंत्राटी कामगारांच्या वेतनामध्ये एकसूत्रता असावी, यासाठी त्यांना एका प्रवाहात आणले जावे. महामेट्रो कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी लवकरच एक बैठक घेण्यात येणार असल्याचे कामगार मंत्री फुंडकर यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages