Mumbai News : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Mumbai News : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Share This

 

मुंबई / कर्जत - आज सकाळी कर्जत रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची आणि कॉलेजला जाणाऱ्या मुलांचा गोंधळ असतो आणि अशातच वाहतूक विस्कळीत झाली होती. सुमारे 7:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे प्रवाशांचा मोठा गोंधळ उडाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत- भिवपूरी स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जत स्थानकाजवळ पेंटाग्राफ तुटल्यामुळे वाहतूकीवर परिणाम झाला.

आज सकाळच्या सुमारास कर्जत रेल्वे स्थानकाजवळ पेटाग्राफ तुटला होता. त्यामुळे 7:30 वाजल्यापासून सुमारे दीड ते दोन तास कर्जत रेल्वे स्टेशनहून मुंबईच्या दिशेला येणारी लोकल वाहतूक बंद झाली होती. मात्र या काळात कर्जत रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम सुरु केलं. त्यानंतर कर्जत रेल्वे स्टेशनहून मुंबईच्या दिशेला येणारी लोकल वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे. रेल्वे वाहतूक सुरु झाली असली तरी देखील सध्या काही गाड्यांचा प्रवास उशीराने होत आहे, त्यामुळे प्रवाशांना प्रचंड समस्यांचा सामना करावा लागत आहे.मंगळवारी पहाटे देखील मुंबईजवळील मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मुंबई लोकल ट्रेन सेवा प्रभावित झाली होती. दिवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान दक्षिणेकडे जाणाऱ्या धीम्या ट्रॅकवर पहाटे 4.55 वाजता सिग्नलच्या समस्येमुळे मुंबई लोकल ट्रेन सेवा किमान 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत होत्या.

घडलेल्या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे 7:30 वाजण्याच्या सुमारास कर्जत रेल्वे स्थानकाजवळ पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम झाला होता. काही काळासाठी कर्जत- भिवपूरी स्थानकादरम्यानची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. मात्र सुमारे दीड ते दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आता कर्जत-सीएसएमटी लोकल वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे. मात्र आता देखील काही गाड्या उशीराने धावत आहेत, त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचण्यासाठी उशीर होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages