उद्या (११ फेब्रुवारी) पासून बारावीची परीक्षा, राज्यात १५ लाख विद्यार्थी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 February 2025

उद्या (११ फेब्रुवारी) पासून बारावीची परीक्षा, राज्यात १५ लाख विद्यार्थी



मुंबई - उद्या (११ फेब्रुवारी) पासून १८ मार्च २०१५ कालावधीत बारावीची परीक्षा होत आहे. यंदाच्या वर्षी परीक्षेत एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यामध्ये ८ लाख १० हजार ३४८ मुले, तर ६ लाख ९४ हजार ६५२ मुली आहेत. यंदा ३७ तृतीयपंथी विद्यार्थीही परीक्षेसाठी बसले आहेत. राज्यात एकूण १० हजार ५५० कनिष्ठ महाविद्यालयातील या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ३ हजार ३७३ मुख्य केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

विज्ञान शाखेला ६८ हजार ९६७ विद्यार्थी, कला शाखेला तीन लाख ८० हजार ४१० विद्यार्थी, वाणिज्य शाखेला तीन लाख १९ हजार ४३९ विद्यार्थी तर किमान कौशल्य आधारित अभ्यासक्रम ३१ हजार ७३५ विद्यार्थी आहेत. टेक्निकल सायन्स ४ हजार ४८६ असे एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थी यंदा परीक्षा देणार आहेत. पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात ही परीक्षा होणार आहे. महाराष्ट्राचे माध्यमिक उच्च माध्यमिक नव विभागीय मंडळात ही परीक्षा होणार असून नव विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

गेल्या वर्षी फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेमध्ये वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आलेला आहे. दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाचे प्रकरणी आढळून येतील त्या केंद्राची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षापासून कायमची रद्द करण्याबाबतची कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात येत आहे. कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी मंडळांनी अर्ध शासकीय पत्राद्वारे आव्हान केलेले आहेत.

राज्यात २७१ भरारी पथके -
परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात २७१ भरारी पथके नेमण्यात आले आहेत. याशिवाय दक्षता समिती कार्यरत असून विभागीय मंडळात विशेष भरारी पदके स्थापन करण्यात आले आहेत. मंडळाने निर्धारित केलेल्या कालावधीत विद्यार्थी, वैद्यकीय कारणास्तव प्रत्यक्ष तोंडी परीक्षा प्रकल्प व इतर परीक्षा देऊ न शकल्यास अशा विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेनंतर १२,१५,१७ मार्च रोजी आऊट ऑफ टर्न आयोजित करण्यात आलेले आहे. राज्यात मागील ९ परीक्षा विभागीय मंडळात एकूण ३ हजार ३७६ केंद्र आहेत, त्यातील ८१८ केंद्रावरील केंद्र संचालक बदलले गेले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad