रिक्षा व टॅक्सीचालकांसाठी निवृत्ती सन्मान योजना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 February 2025

रिक्षा व टॅक्सीचालकांसाठी निवृत्ती सन्मान योजना



मुंबई - धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटोरिक्षा, मीटर टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळामार्फत राज्यातील रिक्षा, टॅक्सीचालकांना विविध लाभ देण्यात येणार आहेत. मंडळाच्या ६५ वर्षांवरील सभासद चालकांना निवृत्ती सन्मान योजनेंतर्गत विशिष्ट दिनानिमित्त १० हजार रुपये सन्मान निधी दिला जाणार आहे. त्यासाठी रिक्षा, टॅक्सीचालकांना आवश्यक अटी, शर्ती पूर्ण कराव्या लागणार आहेत. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतची घोषणा केली.

रिक्षा व मीटर टॅक्सीचालकांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा तसेच सभासद चालकांसाठी जीवन विमा, अपंग विमा अशा आरोग्य योजना राबविणे विचाराधीन आहेत. तसेच त्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजनादेखील राबवली जाणार आहे. तसेच कर्तव्यावर असताना एखाद्या चालकास दुखापत झाल्यास त्याला या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाणार आहे, तर उत्कृष्ट रिक्षा-टॅक्सीचालक, उत्कृष्ट रिक्षा/टॅक्सीचालक संघटना तसेच उत्कृष्ट रिक्षा स्टॅन्ड यांच्यासाठी आकर्षक बक्षीस योजना दरवर्षी राबवली जाईल, असे सरनाईक यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad