Crime News - स्वारगेट बस डेपोत 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Crime News - स्वारगेट बस डेपोत 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार

Share This

पुणे - पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर चक्क बसमधे बलात्कार केल्याची घटना उजेडात आली आहे. यातील पीडित 26 वर्षीय तरुणीवर पहाटे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

पुढे आलेल्या माहितीनुसार, 26 वर्षांची तरुणी मंगळवारी (25 फेब्रुवारी) पहाटे पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात आली. तीला फलटणला जायचे होते. त्यावेळी स्वारगेट परिसरात सराईत गुन्हेगार असलेला दत्तात्रय गाडे सावज हेरण्याचा प्रयत्न करत होता. 26 वर्षांची ही मुलगी एकटी आहे हे पाहून गाडेने तीला आगारात मधोमध उभी असलेली एस टी फलटणला जाणार आहे असं सांगितलं. सोलापुरहून स्वारगेटला उभी असलेली ही बस पुन्हा सोलापुरला जाणार असून वाटेत ती फलटणला थांबेल असं त्याने पिडीतेला सांगितलं. हे सगळं सांगताना तो पिडीतेला ताई - ताई असे म्हणत होता. त्याच्यावर विश्वास ठेऊन ही तरुणी बसमधे चढली. तीच्या पाठोपाठ दत्तात्रय गाडे देखील बसमधे चढला आणि त्याने तीच्यावर बलात्कार केला. त्यानंतर याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने या तरुणीला दिली. त्यामूळे घाबरुन जाऊन ही तरुणी तीच्यासोबत घडलेला प्रकार कोणाला सांगु शकली नाही. पिडीत तरुणीला दत्रात्रय गाडेने जीवे मारण्याची धमकी दिल्याने ही तरुणी घाबरुन गेली. त्यामुळे स्वारगेट बस स्थानकावर आरडाओरड करण्याचे त्राणही तीच्यात उरलं नाही. त्यानंतर ती दुसऱ्या बसने फलटणला जायला निघाली. वाटेत असताना तीने हा प्रकार तीच्या घरच्यांना सांगीतला. त्यानंतर पोलीसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळातच पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर असून त्याचा शोध घातला जात आहे. गुन्हा घडल्यावर दत्तात्रय गाडे हा आरोपी फरार झाला असुन त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. दत्तात्रय गाडेवर शिक्रापूर आणि शिरुर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे.

स्वारगेट बसस्थानक शहरातील सुरक्षित बसस्थानक समजलं जातं. तर 24 तास येथून बसेस जात असतात. स्वारगेटला इतक्या गाड्या असताना ही घटना कुणालाच कशी कळली नाही? हा प्रश्न आहे. यामुळं स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या आरोपीला शोधण्यासाठी पथकं रवाना झाली आहेत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages