Mumbai News - 6 मार्चला घाटकोपरमधील पाणी पुरवठा बंद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Mumbai News - 6 मार्चला घाटकोपरमधील पाणी पुरवठा बंद

Share This


मुंबई - घाटकोपर पूर्व येथील, एमआयसीएल प्रोजेक्ट च्या समोर, आर बी मेहता मार्ग, येथे ७५० मिमी व्यासाच्या जल वाहिनीवर अचानक मोठी गळती आढळून आल्याने सदर गळती दुरूस्ती कामासाठी तसेच घाटकोपर अंधेरी लिंक रोड, मराठी विद्यालयासमोर ६०० मिमी व्यासाच्या स्थलांतरित जलवाहिनीचे जोडकाम करणेसाठी दिनांक ०६/०३/२०२५ रोजी सकाळी ९ वा पासून रात्री ९ वा पर्यंत घाटकोपर पूर्व विभागातील पाणीपुरवठा पुर्णपणे बंद असणार आहे. उपरोक्त कामे पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात येईल. महानगरपालिकेच्या वतीने उपरोक्त विभागातील नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे व सदर दुरूस्ती काळात सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages