अर्थसंकल्पात एसटीच्या थकीत देण्यांसाठी विशेष तरतूद करा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 March 2025

अर्थसंकल्पात एसटीच्या थकीत देण्यांसाठी विशेष तरतूद करा


मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आर्थिक संकटात असून कर्मचाऱ्यांची थकीत देणी तसेच महामंडळाची एकूण सर्व थकीत देणी चुकती करण्यासाठी विधिमंडळाच्या या अर्थसंकल्पात एसटीसाठी आर्थिक मदत पॅकेज मंजूर करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केली आहे.

एसटी महामंडळाची तसेच कर्मचाऱ्यांची मिळून अनेक देणी निधी अभावी थकली असून ही देणी चुकती करण्यासाठी साधारण ५००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेची आवश्यकता आहे. या थकीत देण्यामुळे महामंडळ आर्थिक संकटात सापडले असून त्याचा उत्पन्न वाढीवर सुद्धा परिणाम झाला आहे. त्याच प्रमाणे कर्मचाऱ्यांची देणी प्रलंबित असल्याने औद्योगिक अशांतता निर्माण होत आहे. या संकटातून महामंडळाची सुटका करायची असेल तर  सरकारकडून अर्थ सहाय्य देऊन एसटीला मदत केली पाहिजे असेही बरगे यांनी म्हंटले आहे.

महामंडळाची एकूण थकीत देणी!

सरकार कडून न प्राप्त झालेली गेल्या वर्षीची तुटीची रक्कम १००० कोटी रुपये 

थकीत महागाई भत्ता रक्कम १२० कोटी रुपये 

पी. एफ. थकीत रक्कम ११०० कोटी रुपये 

उपदान म्हणजेच ग्राजुटी थकीत रक्कम ११५० कोटी रुपये 

एसटी बँक थकीत रक्कम १५० कोटी रुपये 

एल आय सी थकीत रक्कम १० कोटी रुपये 

रजा रोखिकरण थकीत रक्कम ६० कोटी रुपये 

वैद्यकीय प्रतिपूर्ती थकीत रक्कम १० कोटी रुपये 

डिझेल थकीत रक्कम १०० कोटी रुपये 

भांडार देणी थकीत रक्कम ८० कोटी रुपये 

पुरवठादार कंपनी थकीत देणी रक्कम ५० कोटी रुपये 

अपघात सहाय्यता निधी थकीत रक्कम ३ कोटी रुपये

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad