खेड जवळ कारचा भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यु - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 May 2025

खेड जवळ कारचा भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यु


खेड - आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारची सकाळ राज्यासाठी एक वाईट बातमी घेऊन उजाडली. मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे झालेल्या कार अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला.

प्राथमिक माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर हा अपघात झाला. येथील जगबुडी नदीच्या पुलावरुन कार थेट 100 फूट खाली कोसळली. यामध्ये कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या कारमधील सर्वजण मुंबईतून देवरुख येथे अंत्यविधीसाठी जात होते. मात्र, वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या दुर्घटनेत कारचा चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालायत उपचार सुरु आहेत.

पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. कार जगबुडी नदीवरुन जात असताना भरधाव वेगात होती. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून ती 100 ते 150 फूट खाली कोसळली. कार जोरात खाली आदळल्याने कारचा चेंदामेंदा झाला आहे. ही कार क्रेनच्या साहाय्याने वर उचलण्यात आली. त्यानंतर कारमधील मृतदेह बाहेर काढण्यात आले. या भीषण दुर्घटनेत कारचा चालक आणि एक प्रवासी गंभीररित्या जखमी झाला आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालायत उपचार सुरु असल्याची माहिती पुढे आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS