7 मे ला देशात मॉक ड्रिल, नागरिकांना स्वसंरक्षणाचं ट्रेनिंग देण्याचे आदेश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS

०५ मे २०२५

7 मे ला देशात मॉक ड्रिल, नागरिकांना स्वसंरक्षणाचं ट्रेनिंग देण्याचे आदेश


नवी दिल्ली - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांचे संबंध ताणले गेलेले आहेत. पाकिस्तान हा देश दहशतवादाला खतपाणी घालतो, अशी भूमिका भारताने संयुक्त राष्ट्रसंघात मांडलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये केंद्र सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याची माहिती येत आहे. येत्या ७ तारखेला, बुधवारी संपूर्ण देशात मॉक ड्रिल घेतला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने तसे आदेश दिलेले आहेत. संपूर्ण देशामध्ये याच दिवशी सायरन वाजला जाणार आहे. हवाई हल्ल्याचा अलर्ट देणारा सायरन असेल, असा त्याचा अर्थ आहे.

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशातील सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. भविष्यात युद्धजन्य परिस्थिती उद्भवली तर नागरिकांना धोका होऊ नये, यासाठी सर्वसामान्य लोकांना स्वसंरक्षणाचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे.

विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्य लोकांना स्वसंरक्षण आणि आपल्या परिसराचं संरक्षण करता यावं, यासाठी केंद्र सरकार प्रशिक्षण देणार असल्याची माहिती आहे. केंद्र सरकारने सोमवारी अनेक मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेतल्याची माहिती असून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात येण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

JPN NEWS