Operation Sindoor - भारताचा पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणावर एअर स्ट्राईक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Operation Sindoor - भारताचा पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणावर एअर स्ट्राईक

Share This

नवी दिल्ली / मुंबई - पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर लाँच केलं आहे. या ऑपरेशनअंतर्गत भारतीय लष्कर आणि हवाई दलाने मिळून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे. भारतीय सैन्यदलानं पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादमध्ये 9 ठिकाणांवर स्ट्राइक केला आहे.

मध्यरात्री १ वाजून ४४ मिनिटांनी सर्जिकल स्ट्राईक -
भारतीय लष्कराने एका प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईअंतर्गत, लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केलं, जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले जात होते आणि हल्ल्याचे निर्देश दिले जात होते. या हल्ल्यांमध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांच्या अचूक शस्त्र प्रणालींचा वापर करण्यात आला.

या ९ ठिकाणांवर एअर स्ट्राईक
१) बहावलपूर
२) मुरिदके
३) गुलपूर
४) भीमबर
५) चक अमरु
६) बाग
७) कोटली
८) सियालकोट
९) मुजफ्फराबाद

‘ऑपरेशन सिंदूर’ हे सांकेतिक नाव: पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर रात्रीच्या हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे सांकेतिक नाव देण्यात आले, बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मद आणि मुरीदकेमधील लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी नेत्यांना संपवण्यासाठी या मोहिमेचा उद्देश होता. या मोहिमेसाठी सिंदूर हे नाव स्वतःचे महत्त्व दर्शवते. सिंदूर हा हिंदी शब्द आहे ज्याचा अर्थ सिंदूर आहे, जो विवाहित हिंदू महिला अनेकदा त्यांच्या कपाळावर लावतात. या ऑपरेशनचे नाव, २२ एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी २६ जणांना, बहुतेक पर्यटकांना गोळ्या घालून ठार मारल्याचा सूड घेण्यात आला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील सर्व मृत पुरूष होते ज्यांना मारण्यापूर्वी त्यांची नावे आणि धर्म विचारण्यात आला होता.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया
ऑपरेशन सिंदूर बाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की मी याबाबत ऐकलेय, इट इज शेम, अपेक्षा आहे की हे लवकर समाप्त होईल. कोणत्याही दोन बलवान देशांना युद्धाच्या मार्गावर जाताना पाहू शकत नाही. या दोन्ही देशांचा इतिहास जुना असून तणाव वाढलेला आहे. मात्र, जगाला युद्ध नकोय शांतता पाहिजे, असं ट्रम्प म्हणाले. हे लवकर संपेल अशी आशा बाळगतोय, असं ट्रम्प म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages