
मुंबई - भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोन घिरट्या घालत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. त्यानंतर पोलीस आणि सीआयएसएफ जवानांनी कोंबिंग ऑपरेशन केले आहे.
मुंबईच्या साकिनाका परिसरात एक संशयास्पद ड्रोन दिसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. यामुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सहार विमानतळ येथून यासंदर्भात फोन आला होता. त्यानंतर पोलीस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली. प्राथमिक माहितीनुसार, हजरत तैय्यब जलाल मस्जिदच्या वरती हा ड्रोन दिसून आला होता. काही क्षणांतच तो ड्रोन साकिनाका झोपडपट्टी परिसराच्या दिशेने गेला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून साकिनाका पोलीस ठाण्याने तत्काळ कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. पोलीस विविध पथकांसह परिसरात तपास करण्यात आला. या प्रकरणी साकीनाका पोलीस आणि सीआयएसएफ यांनी हरी मस्जिद परिसर जरीमरी येथे पहाटे पाच वाजताच्या दरम्यान कोंबिंग ऑपरेशन केले आहे. मात्र, यात असे ड्रोन वैगरे काहीही आढळून आले नाही. तरी नागरिकांनी पॅनिक होऊ नये, असे आवाहन साकीनाका पोलिसांनी केले आहे.
No comments:
Post a Comment