
मुंबई - आज महाराष्ट्रात एसएससी बोर्डाचा १० वीचा निकाल जाहीर झाला. याचबरोबर आज सीबीएसई बोर्डाने देखील १२ वीचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएससीच्या १२ वीचा निकाल ८८.३९% लागला आहे. विद्यार्थी, पालक हा निकाल cbse.gov.in, results.cbse.nic.in वर जाऊन पाहू शकतात.
सीबीएसई १२ वीची १७.८८ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तर १० वीचे मिळून एकूण ४२ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. गेल्या वर्षीपेक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ०.४१% ने वाढले. तर मुलींनी मुलांपेक्षा ५.९४% पेक्षा जास्त गुणांनी आघाडी घेतली आहे. ९१% पेक्षा जास्त मुलींनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
सीबीएसई बोर्ड कोणतीही मेरीट लिस्ट जारी करत नाही, तसेच टॉपर कोण याचीही घोषणा करत नाही. तसेच सर्व शैक्षणिक संस्थांनाही कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेत किंवा जिल्ह्यात टॉपर घोषित करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. सीबीएसईचा १० वी चा निकालही लवकरच लागण्याची शक्यता आहे. हे निकाल डिजिलॉकर, उमंग अॅप आणि एसएमएसद्वारेही पाहता येणार आहेत.
No comments:
Post a Comment