
पुणे / मुंबई - इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा अखेर आज (दि.13) संपली असून, बोर्डाकडून विभागवार निकालची माहिती देण्यात आली. यावेळीदेखील मुलींनीच बोर्डाच्या परिक्षेत बाजी मारली असून राज्याचा एकूण निकाल टक्के 94.10 लागला आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत निकाल १.७१ टक्क्याने कमी झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाचे (10th Result) अध्यक्ष शरद गोसावी यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन हा निकाल जाहीर केला. दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर पालकांना आणि मुलांना आज निकाल पाहता येणार आहे.
या वर्षी दहावीचा राज्याचा निकाल ९४.१० टक्के एवढा लागला आहे. तर कोकण विभागाने पहिला नंबर घेतला असून कोकण विभागाचा ९९.८२ टक्के एवढा निकाल लागला आहे.
या वर्षी दहावीच्या परीक्षेत राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,५८,०२० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी १५,४६,५७९ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४,५५,४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.
राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४,८८,७४५ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ४,९७,२७७विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३,६०,६३० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, १,०८,७८१ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
विभागनिहाय निकालाची टक्केवारी -
कोकण : ९९.८२ टक्के
मुंबई : ९५.८४ टक्के
पुणे : ९४.८१ टक्के
नागपूर : ९०.७८ टक्के
छत्रपती संभाजीनगर : ९२.८२ टक्के
कोल्हापूर : ९६.७८ टक्के
अमरावती : ९२.९५ टक्के
नाशिक : ९३.०४ टक्के
लातूर : ९२.७७ टक्के
ऑनलाईन निकाल येथे पाहता येणार
https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं -
दुपारी 1 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. महाराष्ट्र बोर्डानं यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबची माहिती बोर्डानं एक प्रसिद्धीपत्रक जारी करून यापूर्वीच दिली आहे.
मागील पाच वर्षांमधील दहावीचा निकाल
▪️2024: 95.81
▪️2023: 93.83
▪️2022: 96.94
▪️2021: 99.95
▪️2020: 95.3
No comments:
Post a Comment