
Passive Smoking हे अत्यंत त्रासदायक असू शकते. आज नो टोबॅको डे (No Tobacco Day)असल्याने याचे महत्त्व जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. धुम्रपान न करणाऱ्या व्यक्तींनादेखील फुफ्फुस कर्करोगांचा (Cancer) धोका उद्भवू शकतो असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. तंबाखूच्या सेवनाविरोधी जनजागृती पसरवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
जागतिक आरोग्य संघटनेकडून ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवासानिमित्त तंबाखूच्या सेवनाविरोधी जनजागृती केली जाते. या निमित्ताने आपण या सेकंड हॅंड स्मोकिंग (पॅसिव्ह स्मोकींग) म्हणजे काय आणि त्याचे काय दुष्परिणाम होतात हे जाणून घेणार आहोत. धूम्रपान न करताही अनेक व्यक्ती कर्करोगाचा बळी ठरत आहेत. सध्या भारतात एकूण कॅन्सरमध्ये १० ते १२ टक्के फुफ्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण आढळून येत असले तरी २०३० पर्यंत हे प्रमाण दुप्पट होण्याची शक्यता आहे.
जागतिक आरोग्य संघटनेकडून ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवासानिमित्त तंबाखूच्या सेवनाविरोधी जनजागृती केली जाते. या निमित्ताने आपण या सेकंड हॅंड स्मोकिंग (पॅसिव्ह स्मोकींग) म्हणजे काय आणि त्याडब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, फुफ्फुसाच्या कर्करोगाने पीडित धूम्रपान न करणार्यांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि यात जास्त महिलांचा समावेश आहे.पॅसिव्ह स्मोकिंग याला सेकंड हॅन्ड स्मोकिंग देखील म्हणतात. यामध्ये, व्यक्ती थेट धूम्रपान करत नाही, परंतु दुसऱ्या व्यक्तीच्या सिगारेटमधून निघणाऱ्या धुरामुळे त्याला धोका निर्माण होतो. अशामुळे धूम्रपान न करणार्यांमध्ये या धुरामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका 24 टक्क्यांनी वाढतो. निष्क्रीय धूम्रपान केल्यामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाची प्रकरणे सतत वाढत आहेत.
कसे होते नुकसान
सेकंड आणि थर्ड हँड स्मोकमधील कार्सिनोजेन्समुळे धूम्रपान न करणाऱ्यांना फुफ्फुस, घसा आणि ब्रेस्ट कॅन्सरसह विविध प्रकारचे कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. या विषारी पदार्थांच्या दीर्घकाळ संपर्कामुळे फुफ्फुसाच्या पेशी आणि शरीराच्या इतर भागांमधील डीएनएचं नुकसान होऊन कॅन्सरपेशी तयार होऊ शकतात.
टीजीएच ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटरचे रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. गौरव जसवाल सांगतात की, फुप्फुसांच्या कर्करोगाच्या पूर्वलक्षणांमध्ये दीर्घकाळ खोकला व कफ असणे, खोकल्याद्वारे आणि कधी थुंकीद्वारे रक्त येणे, श्वास घेताना त्रास होणे, आवाजात बदल होणे, सतत फुप्फुसाचे इन्फेक्शन व न्यूमोनिया होणे. सोबतच दीर्घकाळ ताप असणे, अशक्तपणा, वजन कमी होणे ही लक्षणेही आढळून येतात. वरील लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तेवरीत वैद्यकिय सल्ला घेणे गरजेचे आहे.
चे काय दुष्परिणाम होतात हे जाणून घेणार आहोत. धूम्रपान न करताही अनेक व्यक्ती कर्करोगाचा बळी ठरत आहेत. सध्या भारतात एकूण कॅन्सरमध्ये १० ते १२ टक्के फुफ्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण आढळून येत असले तरी २०३० पर्यंत हे प्रमाण दुप्पट होण्याची शक्यता आहे.
फुफ्फुसांचा कर्करोग फुफ्फुसातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होतो. जगभरात कर्करोगाच्या मृत्यूचे हे एक प्रमुख कारण आहे, विशेषतः धूम्रपान करणाऱ्यांमध्ये. फुफ्फुसांचा कर्करोग दोन मुख्य प्रकारांमध्ये विभागला जातो: नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सर (NSCLC) आणि स्मॉल सेल लंग कॅन्सर (SCLC).
लक्षणे:
फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश असू शकतो:सतत येणारा खोकला जो बरा होत नाही
खोकल्यातून रक्त येणे
खोकल्यातून रक्त येणे
खोल श्वास घेतल्यावर किंवा खोकल्यावर छातीत दुखणे वाढते
घशाचा त्रास होणे
भूक न लागणे किंवा वजन कमी होणे, थकवा येणे
कारणे:
फुफ्फुसांच्या कर्करोगाचे सर्वात सामान्य कारण म्हणजे धूम्रपान. धूम्रपान करणाऱ्या लोकांना फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका खूप जास्त असतो. इतर कारणांमध्ये हे समाविष्ट आहे: एस्बेस्टोस किंवा इतर हानिकारक पदार्थांचा संपर्क, काही पर्यावरणीय घटकांचा संपर्क, अनुवांशिक कारणेदेखील त्याला कारणीभूत ठरतात.
No comments:
Post a Comment