मुंबई - गुरुवार २४ जुलै २०२५ ते रविवार २७ जुलै २०२५ या कालावधीदरम्यान सलग ४ दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. तर, दिनांक २६ जुलै २०२५ रोजी समुद्रात सर्वात मोठी म्हणजे ४.६७ मीटर इतक्या उंचीच्या लाटा उसळणार आहेत. भरती काळादरम्यान नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये, तसेच, या अनुषंगाने प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेडून नागरिकांना करण्यात आले आहे.
जुलै २०२५ महिन्यातील भरतीसंदर्भात माहिती
१. गुरुवार, दि. २४.०७.२०२५ सकाळी – ११.५७ वा. लाटांची उंची (मीटर) - ४.५७
२. शुक्रवार, दि. २५.०७.२०२५
दुपारी – १२.४० वा. लाटांची उंची (मीटर) - ४.६६
३. शनिवार, दि. २६.०७.२०२५
दुपारी – ०१.२० वा. लाटांची उंची (मीटर) - ४.६७
४. रविवार, दि. २७.०७.२०२५
दुपारी – ०१.५६ वा. लाटांची उंची (मीटर) - ४.६०

No comments:
Post a Comment