
आहार संघटनेच्या वतीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ‘महाराष्ट्र बंद’बाबत पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र बंदचे कारण सांगितले आहे. “१४ जुलै २०२५ रोजी राज्यव्यापी बंद! अन्याय्यकारक कराच्या बोज्याविरोधात महाराष्ट्रातील परमिट रूम आणि बार बंदच राहणार आहेत. हॉस्पिटॅलिटी उद्योग आपला आवाज सर्वांसमोर मांडत आहे! सोमवार, १४ जुलै २०२५ रोजी, महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम आणि बार आमच्या उद्योगावर लादलेल्या अन्याय्य आणि प्रचंड करवाढीच्या निषेधार्थ संपूर्ण बंद पाळतील.
दारूवरील व्हॅट दुपटीने वाढ करण्यात आली - परवाना शुल्क १५% वाढवण्यात आले. उत्पादन शुल्कात ६०% ची मोठी वाढ करण्यात आली. राज्य सरकारच्या या तीव्र बदलांमुळे असंख्य लहान आणि मध्यम उद्योगांचे अस्तित्व धोक्यात आले आहे, ज्यामुळे हजारो लोकांच्या नोकऱ्या आणि उपजीविका धोक्यात आली आहे.हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (AHAR) कडून निष्पक्ष धोरणांची मागणी करण्यासाठी आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही बंदची हाक देण्यात आली आहे. आम्ही सर्व उद्योग भागधारकांना एकत्र येऊन मजबूत राहण्याचे आवाहन करतो.चला आपण एक स्पष्ट संदेश देऊया – आता पुरे झाले!” असेही या संघटनेने म्हटले आहे.

No comments:
Post a Comment