महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधानावर संजय गायकवाड यांची दिलगिरी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधानावर संजय गायकवाड यांची दिलगिरी

Share This


अकोला - आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर दिलगिरी व्यक्त करत विरोधक माझ्या शब्दाच्या अर्थाचा अनर्थ करत असल्याचे सांगत आपल्या वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण दिले आहे.

दरम्यान, त्रिभाषा सूत्राच्या प्रश्नावर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजी राजे व छत्रपती शिवराय यांच्या बद्दल असभ्य शब्दांचा वापर करून प्रतिक्रिया दिली होती. यामुळे संपूर्ण राज्यात शिवभक्तांच्या भावना दुखावून वाद निर्माण झाला होता. त्यावर आज संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त करत विरोधक माझ्या शब्दाच्या अर्थाचा अनर्थ करत असल्याचे सांगत आपल्या वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण दिले आहे.

….तर मी माझे शब्द मागे घेतो व मी दिलगिरी व्यक्त करतो
माझ्या शब्दाचा अर्थाचा अनर्थ विरोधकांनी केला, मी शिवभक्त असून माझं शिवप्रेम संपूर्ण जगाला माहिती आहे. त्यामुळे माझ्या वाक्याचा अनर्थ झाल्यामुळे ज्या शिवभक्तांची भावना दुखावली असेल तर मी माझे शब्द मागे घेतो व मी दिलगिरी व्यक्त करत आहे असं म्हणत आमदार संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यानंतर त्यांच्यावर टीका करताना शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली. मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना आणि ठाकरेंवर टीका करताना त्यांनी छत्रपती संभाजीराजे आणि शिवरायांबद्दलही अपशब्द वापरले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages