ईद-ए-मिलादची सुटी ८ सप्टेंबर रोजी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ईद-ए-मिलादची सुटी ८ सप्टेंबर रोजी

Share This

 

मुंबई - राज्य सरकारने ईद-ए-मिलादनिमित्त शासकीय सुट्टीच्या तारखेत बदल केला आहे. शासकीय निर्णयानुसार ५ सप्टेंबर २०२५ रोजीची शासकीय सुट्टी ८ सप्टेंबर रोजी जाहीर केली आहे. या निर्णयानुसार मुंबई आणि उपनगर जिल्ह्यातील सरकारी कर्मचा-यांना आता ईदची सुट्टी ८ सप्टेंबर रोजी मिळणार आहे.

ईद-ए-मिलाद निमित्त मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ५ सप्टेंबरला जाहीर करण्यात आली होती. आता ही सुट्टी शुक्रवार ५ सप्टेंबर ऐवजी सोमवार ८ सप्टेंबर रोजी असणार आहे. मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी शुक्रवार ५ सप्टेंबर ही सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम आहे.

शनिवार ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण आहे. राज्यात बंधुता आणि हिंदू – मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी मुस्लीम समुदायाने जुलूसचा कार्यक्रम ८ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी शुक्रवार दि. ५ सप्टेंबर रोजीची सुट्टी आता सोमवार दि. ८ सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहे. मुंबई शहर व उपनगरातील शासकीय कार्यालये ५ सप्टेंबर रोजी नियमित सुरु राहतील, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages