
मुंबई - मुंबईतील मध्यवर्ती आणि प्रचंड गर्दी असलेले रेल्वे स्टेशन म्हणजे दादर. या दादर स्टेशनच्या आवारातील पार्किंगमध्ये आग लागली. प्लॅटफॉर्म क्रमांक १४ जवळ रेल्वे स्टेशनच्या आवारात असलेल्या पार्किंगमध्ये आग लागली, या आगीत अनेक वाहने जळून खाक झाली. आग लागल्यामुळे खाक झालेल्या वाहनांमध्ये सर्वाधिक दुचाकी आहेत. किमान १५ दुचाकींना तर अवघ्या काही मिनिटांत आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही.
आग लागल्याचे लक्षात येताच तातडीने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. वाहन तळ परिसरात असलेल्या लोकांनी तातडीने अनेक वाहने सुरक्षित ठिकाणी नेली. वाहन तळावरील अधिकारी कर्मचारी यांनी तातडीने अग्निशमन उपकरण वापरुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. आगीमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला नाही. पोलीस आणि अग्निशमन दल आग लागण्याचे कारण जाणून घेण्यासाठी चौकशी करत आहे.

No comments:
Post a Comment