
परिवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या भरतीअंतर्गत एकूण १७ हजार ४५० पदे भरली जाणार आहेत. कंत्राटी पद्धतीने भरती होणा-या चालक व सहाय्यक उमेदवाराला दरमहा ३० हजार पगार देण्यात येणार आहे. शिवाय, उमेदवारांना एसटीकडून प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, निवड झालेल्या उमेदवारांसोबत तीन वर्षांसाठी करार केला जाईल. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ३०० व्या संचालक मंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या भरतीचा मुख्य उद्देश एसटी महामंडळाच्या सेवेला अधिक बळकट करणे आणि प्रवाशांना उत्तम सुविधा पुरवणे आहे. १७ हजारांहून अधिक कर्मचा-यांच्या भरतीमुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

No comments:
Post a Comment