Scholarship exam चौथी व सातवी इयत्तेसाठी शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Scholarship exam चौथी व सातवी इयत्तेसाठी शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा होणार

Share This

 

पुणे - राज्यातील गुणवत्तापूर्ण व नाविन्यपूर्ण शिक्षण उपक्रमांना चालना देण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करणा-या जिल्हा परिषद व महानगरपालिकांना अनुक्रमे प्रथम क्रमांकास ५ कोटी, द्वितीय क्रमांकास ३ कोटी आणि तृतीय क्रमांकास २ कोटी रुपयांची प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात येतील, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून चौथी व सातवी इयत्तेसाठी शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. (Scholarship exam to be held again for fourth and seventh grade)

बालेवाडी येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय शालेय शिक्षण परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. शालेय विभागाचे प्रधान सचिव रनजीत सिंह देओल, शिक्षण विभागाचे आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद,राज्य प्रकल्प संचालक संजय यादव, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार,राज्य परीक्षा परिषदेचे संचालक नंदकुमार बेडसे, शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. उद्घाटन सोहळ्यात शालेय शिक्षण मंत्री भुसे यांच्या हस्ते शिक्षक व अधिकारी-कर्मचारी स्पर्धा मार्गदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन संशोधन विभाग प्रमुख डॉ. दत्ता थिटे यांनी तर आभार विभागीय उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी मानले.

महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर यावा
शिक्षण हे आनंददायी, गुणवत्तापूर्ण, भाकरीचे आणि राष्ट्रीयत्वाचे असले पाहिजे असे नमूद करून ते म्हणाले, महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर यावा यासाठी शिक्षण विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे गरजेचे आहे.

शैक्षणिक सहलींचे महत्त्व
कृत्रिम बुद्धिमत्ता(एआय) व तंत्रज्ञानाचा वापर, पायाभूत सुविधा सुधारणा, प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना, शिष्यवृत्ती परीक्षा व निपुण भारत अभियान यावर त्यांनी भर दिला. विद्यार्थ्यांच्या चौकसपणासाठी शैक्षणिक सहलींचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. पुढील शैक्षणिक वर्षापासून चौथी व सातवी इयत्तेसाठी शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा होणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages