अवैध कामावर छापा, महिला अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री पवारांचा दम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 September 2025

अवैध कामावर छापा, महिला अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री पवारांचा दम



कोल्हापूर - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे त्यांच्या थेट आणि धडाडीच्या कामकाजासाठी ओळखले जातात. प्रशासनात त्यांचा दबदबा असल्याचे सर्वत्र मानले जाते. मात्र, बुधवारी घडलेल्या एका प्रकारामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. करमाळा विभागातील पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांच्याशी अजित पवारांचा झालेला फोनवरील संवादाचे रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाले.

आरोप असा आहे की, या संभाषणादरम्यान अंजली कृष्णा यांनी सुरुवातीला अजित पवारांना ओळखले नाही. यामुळे संतापलेल्या पवारांनी त्यांना फोनवर खडेबोल सुनावलेच, पण थेट व्हिडिओ कॉल करून दमदाटी केली. अचानक आलेल्या या कॉलमुळे अंजली कृष्णा गोंधळून गेल्या आणि त्या घाबरत बांधावरच बसल्या, असे सांगितले जाते. हा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू गावात घडला, जिथे अंजली कृष्णा कारवाईसाठी पोहोचल्या होत्या. दरम्यान, हे कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने वाद पेटला आहे. शेतकरी संघटनेनं आरोप केला आहे की, अजित पवारांनी बेकायदेशीर कामांना पाठबळ देत महिला अधिकाऱ्याचा अपमान केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू गावात रस्त्याच्या कामासाठी सुरू असलेल्या मुरूम उत्खननाच्या तक्रारीनंतर पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा घटनास्थळी दाखल झाल्या. या कारवाईदरम्यान त्यांची ग्रामस्थांशी शाब्दिक वादावादी झाली. त्याच वेळी काँग्रेसचे आमदार बाबा जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट फोन लावून तो अंजली कृष्णा यांच्याकडे दिला. फोनवर पवारांनी स्वतःची ओळख करून देत कारवाई तत्काळ थांबविण्याचे आदेश दिले. मात्र, अंजली कृष्णा यांनी त्यांचा आवाज ओळखला नाही. यामुळे नाराज झालेल्या पवारांनी कठोर शब्दांत म्हणाले – "मैं डीसीएम अजित पवार बोल रहा हूं, कारवाई बंद करो, मेरा आदेश है."

करमाळ्याच्या पोलीस उपअधिक्षक अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोनवरुन ओळखता आले नाही. त्यानंतर रागावलेल्या अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना खडेबोल सुनावत थेट व्हिडीओ काॅलच केला.

अंजली कृष्णा यांनी पवारांना थेट उत्तर देत, "मेरे फोन पर कॉल करो" असे सांगितल्यावर अजित पवार अधिकच संतापले. त्यांनी कठोर शब्दांत इशारा देत म्हटले – "तुम पे अ‍ॅक्शन लुंगा, इतनी डेरिंग है तुम्हारी? मेरा चेहरा तो पहचानोगी ना?" यानंतर पवारांनी वेळ न दवडता व्हिडिओ कॉल सुरू केला. हा कॉल लागताच अंजली कृष्णा थेट बांधावर बसलेल्या अवस्थेत पवारांशी संवाद साधताना दिसल्या. या संभाषणादरम्यान पवारांनी स्पष्टपणे कारवाई तात्काळ थांबविण्याचे निर्देश दिले. इतकेच नव्हे, तर "माझा फोन आलाय, हे तहसीलदारांना सांगा," असे सांगून त्यांनी अधिकार्‍यांनाही आपला आदेश कळविण्याचे निर्देश दिल्याचे ऐकू आले. दरम्यान, उपस्थित ग्रामस्थांनी सुरु असलेले मुरूम उत्खनन हे ग्रामपंचायतीच्या परवानगीने होत असल्याचा दावा केला. मात्र, त्यांनी आपल्या म्हणण्याचा कोणताही ठोस पुरावा किंवा कागदपत्रं दाखवली नाहीत. त्यामुळे परवानगी वैध असल्याचे सिद्ध न झाल्याने पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा, या महिला आयपीएस अधिकाऱ्यांनी उत्खननाविरुद्धची कारवाई सुरूच ठेवली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS