
मुंबई - राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांच्या आरक्षणासाठीची लॉटरी 11 नोव्हेंबर 2025 रोजी काढण्याची तारीख निश्चित केली आहे. या लॉटरीद्वारे अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्गीय (OBC) तसेच महिला राखीव जागांचे निर्धारण केले जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भातील संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्तांच्या नावे अधिसूचना जारी केली असून त्यानुसार 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरदरम्यान आरक्षित होणाऱ्या प्रभागांची संख्या निश्चित करण्यासाठी आयोगाची परवानगी घेण्यात येईल.
यानंतर 6 नोव्हेंबर रोजी आरक्षणाची सार्वजनिक अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल, आणि 11 नोव्हेंबर रोजी लॉटरी काढण्यात येईल. या लॉटरीचा निकाल राज्य निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल.
त्यानंतर 14 नोव्हेंबर रोजी आरक्षणावर आक्षेप व सूचना मागविण्याचे नमुना जाहीर केले जाईल, तर 20 नोव्हेंबर ही आक्षेप आणि सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख असेल. 21 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत प्राप्त झालेल्या सर्व आक्षेप व सूचनांवर विचारविनिमय करण्यात येईल. अखेरीस 28 नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाच्या मंजुरीनंतर आरक्षणाचे अंतिम नमुने राजपत्रात प्रसिद्ध केले जाणार आहेत.
या वेळापत्रकानुसार मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग मिळणार आहे. 227 जागांच्या या निवडणुकीकडे सर्व पक्षांचे लक्ष लागले असून, वॉर्ड आरक्षणाचे स्वरूप निवडणुकीच्या समीकरणावर निर्णायक ठरणार आहे.
निवडणूक आयोगाचे वेळापत्रक -
30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर : आरक्षित होणाऱ्या वॉर्डांची संख्या निश्चित करण्यासाठी आयोगाची परवानगी घेण्यात येईल.
6 नोव्हेंबर : आरक्षणासंदर्भातील सार्वजनिक अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल.
11 नोव्हेंबर : वॉर्ड आरक्षणाची लॉटरी काढण्यात येईल आणि निकाल राज्य निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल.
14 नोव्हेंबर : आरक्षणावर आक्षेप व सूचना मागविण्यासाठी नमुना प्रसिद्ध होईल.
20 नोव्हेंबर : आक्षेप व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख.
21 ते 27 नोव्हेंबर : प्राप्त आक्षेपांवर विचारविनिमय.
28 नोव्हेंबर : अंतिम आरक्षणाचा नमुना राज्य निवडणूक आयोगाच्या मंजुरीनंतर राजपत्रात प्रसिद्ध केला जाईल.

No comments:
Post a Comment