पालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर, उद्धव ठाकरेंना निर्णय घेण्याची मोकळीक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर, उद्धव ठाकरेंना निर्णय घेण्याची मोकळीक

Share This

मुंबई - काँग्रेसने अखेर मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली. पक्षाने या प्रकरणी मारझोड करणाऱ्यांसोबत अर्थात मनसेसोबत जाण्यास ठाम नकार देत उद्धव ठाकरे यांना स्वतःचा निर्णय घेण्याची पूर्ण मोकळीक दिली. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडी म्हणून राज ठाकरे यांच्या मनसेशी युती करण्याच्या प्रयत्नांत असणाऱ्या उद्धव ठाकरे यांना जबर झटका बसला आहे. (BMC Election 2025) (Congress) 

मुंबई येथे काँग्रेसचे एकदिवसीय शिबिर संपन्न झाले. या शिबिरात बोलताना रमेश चेन्नीथला यांनी काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, काँग्रेस महाविकास आघाडी किंवा इतर कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणालेत.

वर्षा गायकवाड यांचा मनसेसोबत जाण्यास ठाम नकार...
वर्षा गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या पक्षाची भूमिका ठामपणे मांडली. त्या म्हणाल्या, आम्ही देशाचे संविधान मानणारी मंडळी आहोत. आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाणारे लोक आहोत. मुंबईच्या बाबतीत बोलायचे झाले तर आम्ही सातत्याने मुंबईच्या विकासावर बोलतो. आम्ही रोज मुंबईकरांचा त्रास पाहत आहोत. या प्रकरणी सर्वांनी एकत्र येऊन बोलण्याची गरज होती. कारण, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. पण काही पक्षांच्या माध्यमातून सातत्याने जी मारहाण केली जाते किंवा कायदा सुव्यवस्था हातात घेतली जाते. विशेषतः त्यांच्याकडून जी भाषा वापरली जाते, ती भाषा आमच्या सुसंस्कृतपणाला शोभणारी भाषा नाही.

काँग्रेस मारझोड करणाऱ्यांसोबत जाणार नाही... 
वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या, महाविकास आघाडीमध्ये आम्ही किमान समान कार्यक्रमावर चालण्याचा प्रयत्न केला. हा कार्यक्रम सर्वांसाठी असला पाहिजे. संविधानाच्या धाग्यातून असला पाहिजे. परंतु काही पक्षांची भूमिका ही मारहाणीची राहिली आहे. लोकांना त्रास देण्याची राहिली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. उद्धव ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांनी त्यांचा योग्य तो निर्णय घ्यावा. पण सध्या ते ज्या लोकांशी चर्चा करत आहेत, त्यांच्याशी आमचे कितपत जमेल हे आम्हाला माहिती नाही.

उद्धव ठाकरेंनी त्यांचा निर्णय घ्यावा..
एखाद्या छोट्या टपरीवाल्याला किंवा एखादा दुकानदाराला अथवा एखाद्या समोसेवाल्याला मारहाण करणे ही संस्कृती काँग्रेसमध्ये केव्हाही खपली जाणार नाही. त्यामुळे मला असे वाटते की, जे अशा तऱ्हेने कारवाई करतात किंवा मोठ्या उद्योगपतींवर बोलण्यापेक्षा छोट्या - छोट्या माणसांवर आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यासोबत आम्ही जाऊ शकत नाही. त्यामुळे शिवसेनेने (ठाकरे गट) त्यांना कुणासोबत जायचे त्याचा निर्णय घ्यावा. पण काँग्रेस पक्ष म्हणून आमचे म्हणणे आहे की, मुंबईत आलेली सर्व मंडळी ही मुंबईकर आहेत. सर्वांनी मुंबईच्या विकासात हातभार लावला आहे, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages