तिन्ही रेल्वे मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक, प्रवाशांची मोठी गैरसोय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

तिन्ही रेल्वे मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक, प्रवाशांची मोठी गैरसोय

Share This

मुंबई - रेल्वे रूळ, सिग्नलिंग यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर रविवार, १६ नोव्हेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तिन्ही मार्गांवरील ब्लॉकमुळे उपनगरी प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य उपनगरीय विभागात सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ या वेळेत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक राहील. या कालावधीत सीएसएमटीहून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ दरम्यान सुटणाऱ्या डाउन स्लो लोकल्सना जलद मार्गावर वळवण्यात येईल. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला येथे थांबतील. घाटकोपरहून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ दरम्यान सुटणाऱ्या अप स्लो लोकल्सना देखील विद्याविहार–सीएसएमटीदरम्यान जलद मार्गावर चालवले जाईल.

हार्बर मार्गावर पनवेल–वाशी दरम्यान पोर्ट मार्ग वगळून सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ या वेळेत ब्लॉक राहणार आहे. या कालावधीत पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप सेवा सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ पर्यंत रद्द राहतील. तसेच सीएसएमटीहून बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाउन सेवा सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत रद्द करण्यात आल्या आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते राम मंदिर या दरम्यान अप जलद मार्गावर आणि राम मंदिर ते गोरेगाव दरम्यान डाउन जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत पाच तासांचा ‘जंबो ब्लॉक’ ठेवण्यात आला आहे.

रेल्वे प्रशासनाने अत्यावश्यक दुरुस्तीची कामे सुरळीत पार पाडण्यासाठी हा मेगाब्लॉक असल्याचे सांगितले असून, प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages