
मुंबई (जेपीएन न्यूज) - घाटकोपर (प.) – साईनाथ नगर रोड परिसरातील के. व्ही. के. शाळेतील पाच विद्यार्थ्यांना समोसा खाल्ल्यानंतर फूड पॉइझनिंग झाल्याची घटना समोर आली आहे. यामधील दोन विद्यार्थ्यांवर राजावाडी रुग्णालयात सुरू आहेत. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज 17 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना उलटी, पोटदुखीची लक्षणे जाणवू लागली. घटनेची माहिती मिळताच पालकांनी पाच विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉ. अजीत (AMO – राजावाडी रुग्णालय) यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. त्यापैकी 3 विद्यार्थ्यांच्या पालकांनी उपचार नाकारून (DAMA) डिस्चार्ज घेतला आहे. तर इक्रा जाफर मियाज सय्यद आणि वैजा गुलाम हुसेन या दोन विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत. दोघींची प्रकृती स्थिर आहे.
के. व्ही. के. शाळेत अन्नाची बाधा झाल्याने शाळेच्या कँटीनमधील अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत पालकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी सुरू केली असून अन्न तपासणी विभागालाही माहिती देण्यात आली आहे.
उपचार सुरू असलेले विद्यार्थी -
इक्रा जाफर मियाज सय्यद – वय 11 वर्षे
वैजा गुलाम हुसेन – वय 10 वर्षे
डामा डिस्चार्ज घेतलेले विद्यार्थी -
राजिक खान – वय 11 वर्षे
आरूष खान – वय 11 वर्षे
अफजल शेख – वय 11 वर्षे

No comments:
Post a Comment