महानगरपालिकेत सत्ता आल्यास मुंबई प्रदुषण मुक्त करू - खा. वर्षा गायकवाड - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महानगरपालिकेत सत्ता आल्यास मुंबई प्रदुषण मुक्त करू - खा. वर्षा गायकवाड

Share This

मुंबई - मुंबईतील प्रदुषण अत्यंत वाईट पातळीवर गेले असून श्वसनाचे आजार वाढत आहेत. मुंबई करांना स्वच्छ हवाही मिळत नाही. मुंबईची हवा विषारी होणे हा निसर्गाचा दोष नाही तर भ्रष्ट, बेजबाबदार आणि संधीसाधू सरकारचे दुर्लक्ष, निष्काळजीपणा आणि प्रयत्नांच्या अभावाचा परिणाम आहे. काँग्रेस सत्तेत आल्यावर मुंबईकरांच्या श्वासाचा हक्क आम्ही मनपाच्या पहिल्याच दिवशी सुरक्षित करू, असा निर्धार मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई काँग्रेसने आज मुंबईतील वायूप्रदूषणानिमित्तचा जाहिरनामा प्रसिद्ध केला. यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा एकनाथ गायकवाड, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव यु. बी. व्यंकटेश, माजी मंत्री आमदार अस्लम शेख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत, आमदार अमिन पटेल,  डाॅ. ज्योती गायकवाड, जाहीरनामा समितीचे अध्यक्ष माजी आमदार मधु चव्हाण, उपाध्यक्ष प्रणिल नायर, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, अखिलेश यादव, हरगुन सिंह, जिल्हा अध्यक्ष कचरू यादव, अर्शद आझमी, भावना जैन, केतन शाह, राजपती यादव आदी उपस्थित होते.

मुंबईत रस्त्याचे क्राँकीटीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. बांधकामं मोठ्या प्रमाणात वाढली आहेत तर दुसरीकडे झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात येत आहे. मुंबईची हवा अत्यंत खराब झालेली असून अतिप्रदुषित शहरांच्या श्रेणीत मुंबईचा नंबर लागतो. मुंबईमध्ये वाढणारे प्रदूषण हे ठेकेदार व बांधकामदार, निष्क्रिय आणि जनतेच्या वेदनांबद्दल उदासीन असलेल्या सरकारचे अपयश आहे. महायुती सरकारने मुंबईच्या हवेत विष कालवले असून मुंबईकरांचे जीवन आणि शहराचे भविष्य धोक्यात आणत आहे. मुंबई काँग्रेस मुंबईकरांच्या स्वच्छ हवेच्या मूलभूत अधिकारासाठी लढणार आहे. मुंबई क्लीन एअर अ‍ॅक्शन प्लॅन म्हणजेच वाढत्या वायू प्रदूषणाविरोधात ठोस उपाययोजना असलेले आमचे घोषणापत्र जाहीर केले.

यावेळी यु. बी. व्यंकटेश आणि सचिन सावंत यांनीही प्रदूषणावर नियंत्रण आणले पाहिजे व काँग्रेस त्यासाठी कट्टीबद्ध असल्याचे सांगितले.

मुंबई काँग्रेसचा वायु प्रदूषणचा जाहिरनामा..
1️⃣ स्वच्छ हवा हा मुंबईकरांचा मूलभूत हक्क – ‘Right to Clean Air’
* हवेच्या गुणवत्तेच्या निरीक्षणासाठी Air Quality Monitoring infrastructure सक्षम करू- प्रदूषण हॉटस्पॉट्स असलेल्या जागी २४x७ monitoring. 
* काँग्रेस सत्तेत आल्यावर पालिकेच्या धोरणात “स्वच्छ हवा हा प्रत्येक मुंबईकराचा मूलभूत हक्क” अशी औपचारिक तरतूद केली जाईल.
* आरोग्यदायी हवा देणे ही मुंबई महानगरपालिकेची पहिली आणि सर्वोच्च जबाबदारी असेल.
* पुढील पाच वर्षांत मुंबईचा AQI ४० ते ६० या सुरक्षित पातळीवर आणणार.

2️⃣ शहरभर रिअल-टाइम AQI प्रणाली – जनतेला माहिती, प्रशासनाला जबाबदारी
* प्रत्येक वॉर्ड, चौक, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशनवर मोठे AQI डिस्प्ले बोर्ड.
* तासागणिक AQI अपडेट्स – ऑनलाइन व मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध.
* बंद पडलेले सेन्सर्स २४ तासांत दुरुस्त केले जातील.
* वॉर्डनिहाय प्रदूषणाचे स्रोत सार्वजनिकपणे ऑनलाईन जाहीर.
* प्रत्येक वॉर्डसाठी प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा (Ward Level Action Plan) तयार करा.

3️⃣ बांधकाम प्रदूषणावर कठोर नियंत्रण
* बांधकाम आणि सार्वजनिक प्रकल्पांसाठी कठोर प्रदूषण नियंत्रण मानक (Benchmarks) तयार करून त्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल.
* प्रत्येक बांधकाम प्रकल्पावर Fogging guns, green nets, wheel-wash, anti-dust प्रणाली अनिवार्य.
* नियमभंग करणाऱ्यांवर कडक दंड.
* “Name & Shame” – नियम मोडणाऱ्या बिल्डर्सची सार्वजनिक यादी.
* झाकण नसलेले डम्पर/डेब्रिस ट्रक संपूर्ण बंदी.
* Polluters' Pay Policy लागू करून नियम तोडणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करणार.
* सर्व मोकळ्या जागांवरील बांधकामं त्वरित थांबवणार! Open spaces बाबत Zero Tolerance 

4️⃣ औद्योगिक व व्यावसायिक धूर नियंत्रण – ‘Zero Black-Smoke Mumbai’
* धूर नियंत्रण नसलेल्या फर्नेस, औद्योगिक युनिट्सवर त्वरित कारवाई.
* सहामाही उत्सर्जन ऑडिट अनिवार्य.
* कोळसा–लाकूड वापरणाऱ्या हॉटेल्सना LPG किंवा इलेक्ट्रिकवर स्थलांतराचे निर्देश.
* स्मशानभूमींतील धूर नियंत्रित करून इलेक्ट्रिक स्मशानभूमींना प्रोत्साहन.

5️⃣ वाहतूक प्रदूषणावर नियंत्रण – नवे रस्ते, नवी वाहननीती
* वाहतूक धोरणात व्यापक सुधारणा.
* PUC न केलेल्या वाहनमालकांवर कठोर कारवाई; Automated PUC sensors.
* अरुंद व्यावसायिक भागांत congestion charges.
* BEST इलेक्ट्रिक बसचा मोठ्या प्रमाणात विस्तार; सर्व डिझेल बसेसवर एअर-फिल्टर्स अनिवार्य.
* खड्डेमुक्त, स्मूथ रस्त्यांमुळे कोंडी कमी.
* सार्वजनिक वाहतूक अधिक मजबूत, सोयीस्कर आणि आकर्षक बनवणे.

6️⃣ गंभीर AQI स्थितीत आपत्कालीन कारवाई – दिल्लीच्या GRAP पेक्षा कडक
* AQI 200–300: रात्री बांधकाम निर्बंध, धूळ नियंत्रित फवारणी.
* AQI 300–400: गैर-आवश्यक बांधकाम थांबवणे, वाहतुकीवर मर्यादा.
* AQI 400+: सर्व धूळ-निर्माण करणारी कामे तात्काळ बंद. 

7️⃣ नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण
* संवेदनशील गट – मुले, ज्येष्ठ, रुग्ण, मजूर – यांना प्राधान्य.
* अत्यंत प्रदूषित भागांतील शाळांत एअर प्युरिफायर्स.
* AQI > 200 असताना outdoor क्रीडा/शारीरिक उपक्रम स्थगित.
* फ्रंटलाइन कामगारांसाठी N95 मास्क.
* आरोग्य विभागाकडून नियमित प्रदूषण चेतावणी.

8️⃣ हरित क्षेत्राचा विस्तार – ‘Green Mumbai 2030’
* पुढील पाच वर्षांत १० लाख झाडांची लागवड.
* मोठ्या बांधकाम क्लस्टर्सभोवती झाडे लावणे अनिवार्य.
* मॅन्ग्रोव्ह, किनारी हिरवाई, आरे जंगलाचे संपूर्ण संरक्षण.
* फ्लायओव्हर व मेट्रो पिलरवर vertical gardens.

9️⃣ जबाबदारी, पारदर्शकता आणि सतत देखरेख
* ‘Mumbai Clean Air War Room’ ची स्थापना.
* हवा गुणवत्ता व्यवस्थापन विभाग स्थापन.
* 24x7 Surveillance व तात्काळ प्रतिसाद प्रणाली.
* प्रत्येक वॉर्ड अधिकारी धूळ-नियंत्रणासाठी थेट जबाबदार.
* BMC च्या वार्षिक अहवालात AQI लक्ष्यांचा समावेश.
* NGOs आणि नागरिक गटांसोबत मासिक पुनरावलोकन.
* संयुक्त तपासणी पथकांची स्थापना.

🔟 दीर्घकालीन उपाय – नियोजनात हवा, रस्त्यात हिरवाई, प्रकल्पात समतोल
* सर्व पायाभूत प्रकल्पांसाठी AQI Impact Assessment अनिवार्य.
* शहरभर हिरवे कॉरिडॉर आणि breathing zones.
* पुनर्विकास, मेट्रो, कोस्टल रोडसाठी Green Buffer नियम.
* GRAP : हवेची गुणवत्ता खालावल्यास "अधिक कडक उपाययोजना केली जाईल तसेच ग्रेडेड प्रतिसाद प्रणाली आपोआप सक्रिय केली जाईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages