केईएम रुग्णालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘KEM MARD Synapse’ विशेष बुकलेटचे अनावरण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

केईएम रुग्णालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘KEM MARD Synapse’ विशेष बुकलेटचे अनावरण

Share This

मुंबई - केईएम रुग्णालयाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधत ‘KEM MARD Synapse – Connecting Every Resident’ या विशेष बुकलेटचे आज अनावरण करण्यात आले. नव्याने रुजू होणाऱ्या निवासी डॉक्टरांसाठी समर्पित असलेले हे मार्गदर्शक पुस्तक रा. ए. स्मारक व केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्या हस्ते प्रकाशित झाले.

रुग्णालयाच्या 100 वर्षांच्या वाटचालीत प्रथमच अशा प्रकारचे मार्गदर्शक बुकलेट तयार करण्यात आले आहे. केईएमची संस्कृती, कार्यपद्धती, टीमवर्कची परंपरा आणि रुग्णालयाच्या कार्यव्यवस्थेची ओळख नवीन निवासी डॉक्टरांना मिळावी, यासाठी हे बुकलेट विशेषतः डिझाइन करण्यात आले आहे.

हे पुस्तक केवळ माहितीपुरते मर्यादित नसून, वरिष्ठ डॉक्टरांनी कनिष्ठांना दिलेल्या मार्गदर्शनाच्या भावनेतून तयार केल्याची भावना व्यक्त होते. “इथे कशी सुरुवात करायची, काय अपेक्षित आहे आणि आम्ही आमच्या अनुभवानं काय शिकलो” असे आपुलकीचे मार्गदर्शन या बुकलेटच्या माध्यमातून दिले आहे.

निवासी डॉक्टरांच्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव, उपयुक्त सूचना, जीवनशैली, तसेच जबाबदाऱ्या याबाबतचे महत्वपूर्ण पैलू या विशेष आवृत्तीत समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन निवासी डॉक्टरांना अधिक आत्मविश्वास आणि स्पष्टता मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

केईएम मार्डचे अध्यक्ष डॉ. अमर अगमे म्हणाले, “निवासी डॉक्टरांच्या प्रत्येक आव्हानात आणि यशात आम्ही त्यांच्या सोबत आहोत. शताब्दी वर्षात हे बुकलेट प्रकाशित करून आम्ही नवीन बॅचचे मनःपूर्वक स्वागत करतो.”

या कार्यक्रमाला रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी आणि निवासी डॉक्टरांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages