
मुंबई - अमर महल परिसरातील महत्त्वाच्या जलवाहिनीच्या जोडणीचे काम हाती घेतल्यामुळे मुंबईतील ११ प्रशासकीय विभागांमध्ये ३० तास पाणीपुरवठा बंद किंवा कमी दाबाने होणार आहे. सोमवार, १ डिसेंबर रोजी सकाळी १० ते मंगळवार, २ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत ही मोठी पाणी कपात राहणार आहे.
घाटकोपर (पूर्व) येथील छेडा नगर जंक्शन परिसरात ३००० मिमी मुख्य जलवाहिनीला अमर महल बोगदा शाफ्टशी जोडणारी २५०० मिमी जलवाहिनी छेद-जोडणी केली जाणार आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी एकूण ३० तास पाणीपुरवठा बंद/कमी दाबाने ठेवण्यात येणार आहे.
महापालिकेचे आवाहन -
निर्धारित कालावधीत पाणीपुरवठा कमी दाबाने किंवा बंद राहणार असल्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिकेने केले आहे.
पाणीपुरवठा बंद किंवा प्रभावित होणारे विभाग -
शहर विभागातील ए, बी, सी, ई, एफ दक्षिण, एफ उत्तर आणि पूर्व उपनगरातील एम पूर्व, एम पश्चिम, एल, एस व एन विभागांचा पाण्याचा दबाव कमी होईल किंवा काही भागात पुरवठा पूर्णपणे बंद राहील.
कुठल्या भागांना कसा परिणाम?
१) ए, बी, सी विभाग
सेंट जॉर्ज रुग्णालय परिसर, पी. डी’मेलो मार्ग, वाडीबंदर, डोंगरी, मशीदबंदर, बाबुला टँक, मुंबई सेंट्रल परिसर आदी भागांमध्ये
– १ डिसेंबर : कमी दाबाने पाणी
– २ डिसेंबर : पाणीपुरवठा बंद
२) ई विभाग
मदनपुरा, नागपाडा, मुंबई सेंट्रल, कमाठीपुरा, काळाचौकी, डॉकयार्ड रोड, रे रोड, हातिबाग, माउंट रोड, जे.जे. रुग्णालय परिसर
– काही ठिकाणी १ डिसेंबरला कमी दाब
– २ डिसेंबरला अनेक भागात पाणी बंद
३) एफ दक्षिण व एफ उत्तर विभाग
शिव, वडाळा, दादर, प्रतीक्षा नगर, कोरबा मिठागर, सीजीएस कॉलनी, परळ, शिवडी, नायगाव, रुग्णालय परिसर
– १ डिसेंबर : कमी दाब
– २ डिसेंबर : अनेक भागात पाणी बंद
पूर्व उपनगर
४) एल विभाग (कुर्ला-चुनाभट्टी परिसर)
टिळकनगर, नेहरू नगर, सावळे नगर, जागृती नगर आदी भागांमध्ये
– १ डिसेंबर : पाणी बंद
– २ डिसेंबर : कमी दाब
५) एम पूर्व विभाग (शिवाजी नगर–मानखुर्द)
लल्लूभाई, वाशी नाका, देवनार, बीएआरसी वसाहत, मंडाळा परिसर
– १ डिसेंबर : पाणी बंद
– २ डिसेंबर : कमी दाब
६) एम पश्चिम विभाग (चेंबूर)
मैत्री पार्क, लालडोंगर, भक्ती पार्क, टिळकनगर परिसर
– १ डिसेंबर : पाणी बंद
– २ डिसेंबर : कमी दाब
७) एन विभाग (घाटकोपर–विद्याविहार)
घाटकोपर पूर्व–पश्चिम, पंतनगर, राजावाडी, विक्रोळी गाव, सर्वोदय रुग्णालय परिसर
– १ डिसेंबर : काही भागात पाणी बंद
– २ डिसेंबर : कमी दाब
८) एस विभाग (विक्रोळी–भांडुप)
कांजूरमार्ग, भांडुप पूर्व, टागोर नगर
– १ डिसेंबर : पाणी बंद
– २ डिसेंबर : कमी दाब

No comments:
Post a Comment