
मुंबई (जेपीएन न्यूज) - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागामार्फत वांद्रे (पश्चिम) येथील पाली हिल जलाशयाच्या इनलेटवरील व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम शनिवार, २२ नोव्हेंबर २०२५ रोजी मध्यरात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंत हाती घेतले जाणार आहे. या कामामुळे ‘एच पश्चिम’ विभागातील अनेक भागात एक दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्यात येईल. मात्र तोपर्यंत नागरिकांनी आवश्यक पाण्याचा साठा करावा व काटकसरीने पाणी वापरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ४ ते ५ दिवस पाणी गाळून व उकळूनच पिण्याचा सल्ला महापालिकेने दिला आहे. महापालिकेने नागरिकांना सहकार्याचे आवाहन करताना दुरुस्तीमुळे उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींबद्दल दिलगिरीही व्यक्त केली आहे.
कमी दाबाने पाणीपुरवठा होणारे प्रमुख परिसर -
एच पश्चिम ०१ – सामान्य परिक्षेत्र: दांडपाडा, गजदरबंध झोपडपट्टीचा काही भाग, खार पश्चिमेचा काही भाग (सकाळी ६.३० ते ८.३० — वेळ बदल नाही)
एच पश्चिम ०३: कांतवाडी परिसराचा काही भाग, पालीनाका, पाली गावठाण, शेरली, राजन व माला गावाचा काही भाग (सकाळी १०.०० ते दुपारी २.०० — वेळ बदल नाही)
एच पश्चिम ०६ – खारदांडा परिक्षेत्र: खारदांडा कोळीवाडा, दांडपाडा, च्युइम गावठाण, गजदरबंध झोपडपट्टीचा काही भाग, खार पश्चिमेचा काही भाग (सायं. ५.३० ते रात्री १०.०० — विस्तारित तास)
एच पश्चिम ०९ – युनियन उद्यान परिक्षेत्र: हनुमान नगर, लक्ष्मी नगर, युनियन उद्यान मार्ग १ ते ४, पाली हिल व च्युइम गावाचा काही भाग (दुपारी २.०० ते सायं. ५.०० — वेळ बदल नाही)

No comments:
Post a Comment