मुंबईतील रेल्वे वातानुकूलित करणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 November 2025

मुंबईतील रेल्वे वातानुकूलित करणार



मुंबई - मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ढासळली आहे. रेल्वेमध्ये प्रचंड गर्दीची समस्या असून हजारो प्रवासी दररोज रेल्वेच्या दरवाजात उभे राहून लोंबकळत प्रवास करतात. दुस-या बाजूला बसने प्रवास करणंही तितकंच अवघड आहे. वाहतूक कोंडीमुळे बसेस कासवगतीने धावत असतात. मात्र, आता मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कायापालट होणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

भाजपाच्या युथ कनेक्ट या मोहिमेअंतर्गत फडणवीस यांनी मुंबईतील तरुणांशी संवाद साधला. वरळीतील एनएससीआय डोम येथे तरुणांशी बातचीत करत असताना ते म्हणाले, मुंबईत अनेक रस्ते बांधले जात असून काही रस्त्यांना समांतर रस्ते, काही ठिकाणी नवे पूल उभारले जाणार आहेत. तर, काही ठिकाणी भूयारी मार्गांचं जाळं तयार केले जात आहे. यासह आम्ही उपनगरीय रेल्वेचा कायापालट करणार आहोत.

मुंबई उपनगरीय रेल्वे ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. दररोज ९० लाख लोक या लोकलने प्रवास करतात. परंतु, लोकलमध्ये इतकी गर्दी असते की खरा मुंबईकरच या रेल्वेने प्रवास करू शकतो. बाहेरचा माणूस या लोकल ट्रेनमध्ये प्रवेश सुद्धा करू शकत नाही. या लोकलचा विकास करणं आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही विचार केला की सुंदर अशी मेट्रो मुंबईकरांना दिल्यानंतर आता लोकल रेल्वेचा कायापालट करणं आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS