
मुंबई (जेपीएन न्यूज) - मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी (BMC Election 2025) आज, मंगळवारी (११ नोव्हेंबर) प्रभाग आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या सोडतीत अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) तसेच सर्वसाधारण महिला प्रवर्गाकरिता प्रभाग निश्चित करण्यात आले.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार निवडणूक विभागाने आरक्षणाची सोडत काढली. या वेळी अतिरिक्त आयुक्त (शहर) अश्विनी जोशी, सहआयुक्त विश्वास शंकरवार, निवडणूक विभागाचे ओएसडी विजय बालमवार, उपायुक्त विश्वास मोटे, तसेच सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे, पल्लेवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
किती प्रभाग कोणासाठी आरक्षित -
मुंबई महापालिकेत मतदारांमधून निवडून येणाऱ्या नगरसेवकांची एकूण सदस्यसंख्या 227 इतकी आहे. त्यात 50 टक्के महिलांसाठी आरक्षण असल्याने महिलांसाठी 114 प्रभाग राखीव आहेत. अनुसुचित जातीसाठी 15 प्रभाग राखीव असून त्यात महिलांसाठी 8 तर पुरुषांसाठी 7 प्रभाग राखीव आहेत. अनुसुचित जमातीसाठी 2 प्रभाग राखीव आहेत. त्यापैकी महिला आणि पुरुषांसाठी प्रत्येकी एक प्रभाग राखीव आहे. ओबीसींसाठी 61 प्रभाग राखीव आहेत. त्यात 31 प्रभाग महिलांसाठी तर 30 प्रभाग पुरुषांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण 149 प्रभाग असून महिला राखीव म्हणून 74 प्रभाग राखीव आहेत.
अनुसूचित जातीसाठी राखीव प्रवर्ग : (15 प्रभाग राखीव) (महिलांसाठी 8 तर पुरुषांसाठी 7 प्रभाग राखीव)
महिला प्रभाग : 133, 183, 147, 186, 155, 118, 151, 189
पुरुष प्रभाग : 140, 215, 141, 146, 93, 152, 26
अनुसूचित जमातीसाठी राखीव प्रवर्ग : (2 प्रभाग राखीव त्यात महिलांसाठी 1 तर पुरुषांसाठी 1 प्रभाग राखीव)
महिला प्रभाग : 121
पुरुष प्रभाग : 53
ओबीसींसाठी राखीव प्रभाग -
(नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आरक्षित 61 प्रभाग)
ओबीसी महिलांकरिता आरक्षित 31 प्रभाग -
1, 6, 11, 12, 13, 18, 19, 27, 32, 33, 46, 49, 52, 72, 80, 82, 100, 105, 108, 117, 128, 129, 150, 153, 158, 167, 170, 176, 191, 198, 216
ओबीसी पुरुषांसाठी आरक्षित प्रभाग (एकूण 30) -
4, 10, 41, 45, 50, 63, 69, 70, 76, 85, 87, 91, 95, 111, 113, 130, 135, 136, 137, 138, 171, 182, 187, 193, 195, 208, 219, 222, 223, 226
सर्वसाधारण महिलांसाठी राखीव 74 प्रभाग -
2, 4, 14, 15, 16, 17, 21, 24, 28, 31, 37, 38, 39, 42, 44, 51, 56, 60, 61, 64, 66, 71, 73, 74, 77, 78, 79, 81, 83, 84, 88, 94, 96, 97, 101, 103, 110, 112, 114, 115, 116, 124, 126, 127, 131, 132, 134, 139, 142, 143, 156, 157, 163, 172, 173, 174, 175, 177, 179, 180, 184, 196, 197, 199, 201, 203, 205, 209, 212, 213, 218, 220, 224, 227
खुला प्रवर्गासाठी राखीव असलेले 76 प्रभाग -
3, 5, 7, 9, 20, 22, 23, 25, 29, 30, 34, 35, 36, 40, 43, 47, 48, 54, 55, 57, 58, 59, 62, 65, 67, 68, 75, 86, 89, 90, 92, 98, 99, 102, 104, 106, 107, 109, 119, 120, 122, 123, 125, 144, 145, 148, 149, 154, 159, 160, 161, 162, 164, 165, 166, 168, 169, 178, 181, 185, 188, 190, 192, 194, 200, 202, 204, 206, 207, 210, 211, 214, 217, 221, 225

No comments:
Post a Comment