१०० उठाबशांमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू; हायकोर्टाची गंभीर दखल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 November 2025

१०० उठाबशांमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू; हायकोर्टाची गंभीर दखल



मुंबई - शिक्षेच्या नावाखाली बॅगेसह १०० उठाबशा काढायला लावल्याने सहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार (ज्युडिशियल) यांनी सखोल चौकशीचे निर्देश दिले आहेत.

विद्यार्थिनीला दिलेल्या अमानवी शिक्षेबाबत ॲड. स्वप्ना कोदे यांनी उच्च न्यायालयाला पत्र पाठवले होते. त्यानंतर रजिस्ट्रार कार्यालयाने मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्त, तसेच वसई-विरार पालिका प्रशासनाला तत्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या चौकशीचा अहवाल ॲड. कोदे यांना लवकरात लवकर देण्यासही सांगितले आहे.

ॲड. कोदे यांनी त्यांच्या पत्रात काही प्रमुख मागण्या केल्या होत्या—
• विद्यार्थिनीच्या मृत्यूची न्यायालयीन दखल घ्यावी
• राज्य सरकार आणि पोलीस महासंचालकांना नोटीस पाठवावी
• शाळा व्यवस्थापन आणि संबंधित शिक्षकांविरुद्ध गुन्हा नोंदवावा

या सर्व मागण्यांचा विचार करून उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार ज्युडिशियल कार्यालयाने प्रशासकीय स्तरावर चौकशीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्देशांमुळे विद्यार्थिनीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाईची शक्यता वाढली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS