हा पुरस्कार विजयवाडा येथे आयोजित केंद्रीय समारंभात महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (MSACS) यांना प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या ‘काळजी आधार आणि उपचार’ विभागाच्या प्रमुख डॉ. चिन्मयी दास यांच्या हस्ते MSACS च्या उपसंचालक (CST विभाग) डॉ. प्रियांका वाघेला आणि सहायक संचालक प्रदीप सोनवणे यांनी पुरस्कार स्वीकारला.
एचआयव्हीसह जगणाऱ्यांसाठी उत्कृष्ट सेवा -
हा राष्ट्रीय सन्मान महाराष्ट्रातील एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींसाठी पुरवण्यात येणाऱ्या उच्च दर्जाच्या अँटी रेट्रोव्हायरल थेरपी (ART) उपचार सेवेची पावती असल्याचे MSACS च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, तसेच MSACS चे प्रकल्प संचालक सुनील भोकरे आणि अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. विजय कंदेवाड, डॉ. भवानी मुरुगेसन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी शक्य झाल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्र ‘ग्रीन झोन’मध्ये अव्वल -
नाकोच्या कामगिरी निर्देशांकानुसार सर्वाधिक अँटी-रेट्रोव्हायरल उपचार केंद्रे ‘ग्रीन झोन’मध्ये असलेले राज्य म्हणून महाराष्ट्र अग्रस्थानी राहिले आहे.
पाच ART केंद्रांना ‘सर्वोत्कृष्ट’ गौरव -
सप्टेंबर 2025 च्या अंतिम गुणपत्रिकेनुसार 75 पेक्षा अधिक गुण मिळवून ‘ग्रीन झोन’मध्ये स्थान मिळवलेल्या 16 केंद्रांपैकी पाच सर्वोत्तम केंद्रांचा सत्कार करण्यात आला. त्यात—
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड
एएफएमसी, पुणे
उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर
डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर
ग्रामीण रुग्णालय / जिल्हा रुग्णालय, धाराशिव

या ART केंद्रांनी खालील बाबींमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली -
नोंदणीकृत सर्व HIV–पॉझिटिव्ह व्यक्तींना सर्वसमावेशक उपचार उपलब्ध करणे
नियमित फॉलो-अप
मजबूत आधारयंत्रणा
उपचार सातत्य राखणे
नोंदणीकृत सर्व HIV–पॉझिटिव्ह व्यक्तींना सर्वसमावेशक उपचार उपलब्ध करणे
नियमित फॉलो-अप
मजबूत आधारयंत्रणा
उपचार सातत्य राखणे
पाच ART केंद्रांना ‘सर्वोत्कृष्ट’ गौरव -
सप्टेंबर 2025 च्या अंतिम गुणपत्रिकेनुसार 75 पेक्षा अधिक गुण मिळवून ‘ग्रीन झोन’मध्ये स्थान मिळवलेल्या 16 केंद्रांपैकी पाच सर्वोत्तम केंद्रांचा सत्कार करण्यात आला. त्यात—
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड
एएफएमसी, पुणे
उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर
डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर
ग्रामीण रुग्णालय / जिल्हा रुग्णालय, धाराशिव
खासगी क्षेत्रही आघाडीवर-
खासगी वैद्यकीय संस्थांमधील ART केंद्रांपैकी काशिबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय, पुणे आणि लोटस मेडिकल फाउंडेशन, कोल्हापूर या दोन्ही केंद्रांनाही ‘ग्रीन झोन’मध्ये प्राप्त स्थानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्राचे यश
एचआयव्हीवरील उपचार सुविधा सुलभ करणे, सातत्यपूर्ण औषधपुरवठा, तांत्रिक मार्गदर्शन, आणि गरजू व्यक्तींना मोफत व सर्वसमावेशक सेवा देणे या क्षेत्रात महाराष्ट्राने केलेली ही प्रगती राष्ट्रीय स्तरावर आदर्श ठरली आहे.
नाकोचा हा पुरस्कार राज्याच्या एड्समुक्त महाराष्ट्र या उद्दिष्टाकडे वाटचाल अधिक वेगाने करण्यास बळ देणारा ठरला आहे.

No comments:
Post a Comment