
महापालिकेच्या पर्यावरण विभागाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कारवाई करण्याची जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन विभागातील ४५० कनिष्ठ आवेक्षकांवर सोपवण्यात आली आहे. यापूर्वी कार्यरत असलेल्या खासगी क्लीन अप मार्शलची व्यवस्था बंद करून महापालिकेच्या स्वतःच्या यंत्रणेला ही जबाबदारी देण्यात आली आहे. परिणामी स्वच्छता राखणे, डेब्रीज सुरक्षितरीत्या झाकून वाहून नेणे, कचरा न जाळणे आणि अनधिकृत डेब्रीज टाकण्यावर अधिक प्रभावीपणे कारवाई होत आहे.
महापालिकेची कारवाई (अहवालानुसार)
स्वच्छ आंगन मोहिम
प्रकरणे : ७८५
दंड : ११.९५ लाख रुपये
डंपरमधून डेब्रीज झाकून न आणणे
प्रकरणे : २७
दंड : ४८,५०० रुपये
कचरा जाळणे
प्रकरणे : ५७
दंड : १८,००० रुपये
अनधिकृत डेब्रीज टाकणे व वाहून नेणे
प्रकरणे : १४५
दंड : ९.६४ लाख रुपये
महापालिकेची ही मोहीम पुढील काही दिवस अधिक तीव्र करण्यात येणार असून, शहरातील स्वच्छता आणि वायू गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.

No comments:
Post a Comment