मुंबई सेंट्रल स्थानकावरील ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई सेंट्रल स्थानकावरील ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

Share This

मुंबई - मुंबई सेंट्रल स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर कम्प्लीट ट्रॅक रिन्यूअल (CTR) कामामुळे 23 नोव्हेंबर 2025 पासून सलग 60 दिवसांसाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकचा परिणाम म्हणून पश्चिम रेल्वेच्या अनेक गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला असून काही गाड्या आंशिक रद्द व शॉर्ट-टर्मिनेट होणार आहेत. (Western Railway train schedule changes due to block at Mumbai Central station)

पश्चिम रेल्वेने प्रवाशांना गैरसोयीबद्दल खेद व्यक्त करत, प्रवासापूर्वी अधिकृत वेबसाईट किंवा हेल्पलाइनवरून अद्ययावत माहिती तपासण्याचे आवाहन केले आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभावित गाड्यांचे तपशील - 
शॉर्ट-टर्मिनेट / आंशिक रद्द गाड्या - 
1. 22946 ओखा – मुंबई सेंट्रल एक्सप्रेस
गाडी दादर येथे शॉर्ट-टर्मिनेट होईल. दादर–मुंबई सेंट्रल दरम्यान सेवा रद्द.

2. 22210 हजरत निजामुद्दीन – मुंबई सेंट्रल एक्सप्रेस
गाडी दादर येथे शॉर्ट-टर्मिनेट. दादर–मुंबई सेंट्रल दरम्यान आंशिक रद्द.

3. 09086 इंदौर – मुंबई सेंट्रल एक्सप्रेस
दादरपर्यंतच गाडीची धाव. पुढील प्रवास रद्द.

4. 09076 काठगोदाम – मुंबई सेंट्रल एक्सप्रेस
गाडी दादर येथेच थांबेल. दादर–मुंबई सेंट्रल मार्ग बंद.

5. 09186 कानपूर अनवरगंज – मुंबई सेंट्रल एक्सप्रेस
गाडी दादर येथे शॉर्ट-टर्मिनेट. दादर–मुंबई सेंट्रल सेवा रद्द.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages