२९ महापालिकांसाठी ८९३ प्रभागांमध्ये १५,९३१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 January 2026

२९ महापालिकांसाठी ८९३ प्रभागांमध्ये १५,९३१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात


मुंबई - राज्यातील २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी प्रक्रिया पूर्ण झाली असून, एकूण ८९३ प्रभागांमध्ये १५ हजार ९३१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करणे, छाननी आणि अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे.

राज्य निवडणूक यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, २९ महापालिकांसाठी एकूण ३३ हजार ४२७ नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले होते. छाननीनंतर त्यापैकी २४ हजार ७७१ उमेदवार वैध ठरले. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत ८ हजार ८४० उमेदवारांनी माघार घेतली. परिणामी, अखेरीस १५ हजार ९३१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

या निवडणुकांमध्ये अनेक महापालिकांमध्ये काही प्रभागांत उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या प्रभागांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. मात्र उर्वरित प्रभागांमध्ये थेट लढती रंगणार असून प्रचाराला वेग आला आहे.

आता सर्वांचे लक्ष प्रत्यक्ष मतदानाकडे लागले असून, २९ महापालिकांच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS